खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी: स्वातंत्र्यपूर्व काळात बाळ गंगाधर टिळक यांनी देशाला एकत्र करण्यासाठी सुरू केलेली श्री गणेशोत्सवाची परंपरा आज भारताच्या कानाकोपऱ्यात एक भक्ती भाव आदर्श व एकतेचे प्रतीक म्हणून पूजली जाते. याच पद्धतीने प्रत्येक खेड्यापाड्यातील या शतकोत्तर गणेश मंडळांनी ही परंपरा राखली आहे. अशाच पद्धतीने खानापूर तालुक्यातील सावरगाळी येथील लोकमान्य गणेशोत्सव मंडळांनी पन्नास वर्षाची परंपरा राखत. गावच्या विकासाचा आढावा गावातील पूर्वीची व आजची परंपरा. अनेकांचे योगदान शिवाय मंडळाचा कारभार याचा आढावा देणारी छापण्यात आलेली सुवर्ण झेप पुस्तिका ही इतिहासाला उजाळणी देणारी व वर्तमान काळात प्रेरणा देणारी ठरेल यात शंका नाही. असे गौरवोद्गार खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष घाडी यांनी व्यक्त केले. शनिवारी सावरगाळी येथे गणेशोत्सवाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त महिलांचा हळदीकुंकू कार्यक्रम व सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावातील थोर माता आनंदी घा. पाटील होत्या.
प्रारंभी प्रस्ताविक स्वागत मंडळाचे कार्यवाह पाटील यांनी करून परिचय दिला. प्रस्तावना प्राध्यापक आय. एम. गुरव यांनी करून मंडळाच्या कार्याची माहिती दिली. व त्यानंतर भाजपने त्या धनश्री सरदेसाई , मराठी शाळेच्या शिक्षिका जी डी मेलवकी, सहशिक्षिका विजया मादार आदी मान्यवरांच्या हस्ते लोकमान्य फोटोचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. या निमित्ताने खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेस अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बार असोसिएशनचे अध्यक्ष व तालुका ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष ईश्वर घाडी यांचा सन्मान करण्यात आला.
प्रसंगी महिलांनी महिषासुर मर्दिनी बनावे. धनश्री सरदेसाई
यावेळी हळदीकुंकू कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीच्या बेळगाव जिल्हा ग्रामतर सचिव धनश्री सरदेसाई बोलताना म्हणाल्या, स्वातंत्र्यानंतरच्या काळात खऱ्या अर्थाने महिलांच्या सबलीकरणाला सुरुवात झाली आहे. आज शासनाने 50% आरक्षण महिलांना देऊन एक सक्षम महिला बनवण्यासाठी प्रेरणा दिली आहे. तरी देखील आजच्या काळात महिलांच्या वरील अत्याचार थांबताना दिसत आहेत. पण हे अत्याचार थांबवण्यासाठी महिलानी मागे न थांबता महिषासुर मर्दिनी व्हायला मागे पाहू नये. असे मार्गदर्शन त्यांनी केले. तसेच मंडळाने आयोजित दिलेल्या या कार्याचे कौतुक करून समाजातील आजची परिस्थिती याबद्दल विचार मांडले. यावेळी व्यासपीठावरून माजी तालुका पंचायत सदस्य महादेव घाडी, पत्रकार वासुदेव चौगुले, तालुका हमी योजना समितीचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी , विनायक मुतगेकर यांनी विचार मंथन केले. यावेळी प्रमुख वक्ते या नात्याने बोलताना गुंजी येथील अधिवक्त्या लीना दीपक देसाई यांनीही समाजात महिलांची भूमिका, व कायद्याच्या तरतुदी या संदर्भात माहिती देऊन गणेशोत्सवातील कार्याचा गौरव केला. पूर्वीच्या काळापासून सुरू असलेली ही गणेशोत्सव परंपरा मातृभाषा टिकवण्याबरोबर समाजाला बांधलेली राखण्याचे काम करत आले आहेत तीच पद्धत भविष्यात अशा मंडळींनी करावी असेही सुचोवात त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी गावातील रणरागिणी माझ तालुका पंचायत सदस्या नम्रता नारायण कापोलकर, ग्रामपंचायत माजी उपाध्यक्ष चंद्रभागा नाईक, लक्ष्मी मोहन पाटील, माजी सदस्य सविता मादर शिक्षिका तसेच सामाजिक क्षेत्रात वावणाऱ्या महिलांचा सन्मान केला व त्यानंतर महिलांचा हळदीकुंकू कार्यक्रम उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला अनेक माहीर्वासिनी गावातील महिला मंडळ व युवती बहुसंख्येने उपस्थित होत्या. शेवटी आभार मंडळाचे अध्यक्ष नारायण कापोलकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून केले.