- खानापूर : हलशी येथील छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडले आहेत. यावेळी वैयक्तिक आणि संगीत स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये विद्यार्थ्याने यश मिळवले आहे.
- शाळेच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेचे उद्घाटन मुख्याध्यापक किरण देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेच्या उद्घाटनानंतर मुख्याध्यापक देसाई यांनी विद्यार्थ्यांनी शालेय अभ्यासक्रमाबरोबरच विविध खेळांचे प्रशिक्षण घेऊन पुढे गेले पाहिजे. विभाग व तालुका स्तरावर झालेल्या स्पर्धांमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केली आहे. तर शाळेची विद्यार्थिनी निशा पाटील हीने जुडो या क्रीडा स्पर्धेत राज्यस्तरावरून मजल मारून शाळेचे नाव उज्वल केले आहे. येणाऱ्या काळात खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम हाती घेतले जाणार आहेत अशी माहिती दिली.
- प्रारंभी विद्यार्थ्यांनी पथसंचलन केले. यावेळी शाळेतील शिक्षकानी मानवंदना स्वीकारली. त्यानंतर शिवाजी, शहाजी, संभाजी व तानाजी गटातील विद्यार्थ्यांनी हॉलीबॉल,कबड्डी, खो-खो, १००, २००, ४००, ८०० मिटर धावणे, उंच उडी, लांब उडी, थाळीफेक आधी प्रकारांमध्ये भाग घेऊन प्रथम व दुसरा क्रमांक मिळवला आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रीडा शिक्षिका शामल बेळगावकर, प्रियांका काकतकर, भाग्यश्री दळवी, शंकर रागी पाटील, सुदन देसाई, लक्ष्मण पाटील, एस जी दड्डीकर यांनी परीश्रम घेतले