खानापूर लाईव्ह न्युज प्रतिनिधी:
खानापूर तालुक्यातील हलगा येथे परमपूज्य श्री श्री गोपाळकृष्ण महाराज यांच्या कृपाशीर्वादाने बांधण्यात आलेल्या श्री हनुमान मंदिराचा उद्घाटन समारंभ रविवार दिनांक 16 जून रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या निमित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
मंदिराचे उद्घाटन काका महाराज हालगा यांच्या हस्ते होणार असून गाभाऱ्याचे उद्घाटन आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार अरविंद पाटील यांच्या हस्ते होणार आहे. तर गोपाळकृष्ण महाराज सभागृहाचे उद्घाटन निजद नेते नासिर बागवान, माजी जिल्हा पंचायत सदस्य ज्योतिबा रेमानी ,उद्योजक शिवानंद मुगळे हाल, उद्योजक विनायक लिमये, डॉक्टर मनोज जोशी मुंबई आदींच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला तालुक्यातील विविध स्तरातील मान्यवर मंडळींना निमंत्रित करण्यात आले आहे. यानिमित्ताने सायंकाळी चार वाजता महिलांसाठी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून रात्री आठ वाजता ह भ प ब्रह्मचैतन्य सद्गुरू न्यायमूर्ती श्री विठ्ठल दादा वासकर महाराज पंढरपूर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. तरी भाविकांनी व नागरिकांनी तसेच देणगीत आणि उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिर्णोद्धार कमिटी व पंच कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.