Screenshot_20240910_123314

खानापूर लाईव्ह न्युज / प्रतिनिधी:

डोंगराच्या कपारीवर वसलेले गाव. गावातील सामाजिक बांधिलकी एकतेचा संदेश देणारे गाव म्हणजे बेकवाड ग्रामपंचायत क्षेत्रातील हाडलगा गाव होय. या ठिकाणी गेल्या तीन वर्षापासून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी येथील युवकांनी पुढाकार घेतला. ग्रामस्थांनीही या प्रतिसादाला साथ दिली अन गेल्या तीन वर्षापासून मोठ्या उत्साहाने या श्री गणेशोत्सवाला सुरुवात करण्यात आली आहे. यावर्षीही उत्तम मंडपाची आरास व विविध कार्यक्रमांचे आयोजन करून हा उत्सव साजरा केला जात आहे. दैनंदिन कार्यक्रमात गावातील विविध संघ संस्था मंडळ आणि या गणेशोत्सव मंडळाच्या महाआरतीसह महाप्रसादासाठी उपक्रम राबवला असून काल तिसऱ्या दिवशीचा आरतीचा मान हाडलगा गावातील आजी व माजी सैनिक(आर्मी ग्रुप) देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
हाडलगा गावातील आजी व माजी सैनिकांनी गावातील स्वच्छता अभियान ही योजना राबवून गावाची स्वच्छता केली. तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ चे अध्यक्ष कु.गजानन जयवंत खानापूरकर तसेच सर्व पदाधिकारी मंडळ व पूर्ण गावकरी बंधू यांनी या उत्सवातून आणले आहे. तसेच हाडलगा गावचे आजी व माजी सैनिक यांच्या वतीने महाप्रसाद चे आयोजन केलेले व रात्री कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. गावातील आजी व माजी सैनिक खालील प्रमाणे
कृष्णा खवरे, रामा खवरे, मोहन खवरे, उत्तम कोलेकर, किरण कोलेकर, बडकू कोलेकर, नितीन बेळवटकर, निलेश बेळवटकर, नामदेव बेळवटकर ,सागर बेळवटकर, महेश बेळवटकर, भगवंत ओऊळकर, लक्ष्मण अनगोळकर, यल्लाप्पा मडवाळकर, संजय मडवाळकर, मधुकर मडवाळकर, राजेश मडवाळकर, विठ्ठल खानापूरकर, साईनाथ खानापूरकर, निलेश खानापूरकर, संदीप खानापूरकर, राहुल खानापूरकर, सातेरी बेळवटकर, राहुल आनगोळकर आजी माजी सैनिकांचा समावेश आहे.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us