खानापुर: जीवन विद्या मिशनच्या वतीने येत्या रविवार दि. 2 जुलै 2023 रोजी सकाळी 09 ते सायंकाळी 06 पर्यंत बेळगाव मराठा मंदिर रेल्वे ओवर ब्रिज च्या बाजूला गोवा वेस् या ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव 2023 च्या निमित्ताने’ कृतज्ञता दिन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यासाठी मुंबईहून खास श्री शैलेश रेगे हे उपस्थित राहणार आहेत. या मार्गदर्शन शिबिरात या भूमंडळाचे ठाई, सद्गगुरू दुजा ऐसा नाहीं, या विषयावर त्यांचे व्याख्यान होणार आहे. तरी खानापूर सह बेळगाव भागातील अनेक सद्गुरु वामनराव पै भक्तांनी उपस्थित राहण्याचा लाभ घ्यावा असे आवाहन खानापूर मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.