खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी ;
खानापूर तालुक्यातील गुंजी ग्रामपंचायतच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवडणूक सोमवारी पार पडली. यामध्ये अध्यक्षपदी संतोष कृष्णा गुरव यांची तर उपाध्यक्षपदी अमोल बाबुराव बेळगावकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मी घाडी, सरोजा बुरुड, अन्नपूर्णा मादार, वनिता देऊळकर, प्रताप नाळकर, हणमंत जोशिलकर, राजू चोळणेकर, प्रवीण पाटील, यशोदा सुतार, स्वाती गुरव यांचे सहकार्य लाभले.
निवडणूक अधिकारी म्हणून कृषी सहायक निर्देशक डीबी चव्हाण यांनी काम पाहिले उपस्थितांचे स्वागत व व सत्कार ग्रामपंचायत च्या वतीने ग्रामपंचायत विकास अधिकारी आनंद भिंगे यांनी केले.