
खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी:
गाव तिथे मंदिर अशा संकल्पनेतून पुरातन काळापसून आपण झाले तिथे मंदिरे निर्माण झाली ती गावची वैभवी ठरली आहेत. पुरातन जीर्ण आणि लहान मंदिरे ही भविष्यात धर्म संस्कृती जतन करणारी प्रेरणादायी क्षेत्रे राहावीत. यासाठी गावागावातील जुन्या मंदिरांचे जतन करून त्यांचा जीर्णोद्धार हाती घेणे हे आजच्या पिढीचे कर्तव्य बनते. भारतीय संस्कृती अखंड ठेवण्यासाठी अशा मंदिरांचा जिर्णोद्धार करून गावचे वैभव वाढवले जात आहे. अशाच पद्धतीने झाड नावगा येथे देखील पुरातन श्री कलमेस्वर मंदिराच्या जिर्णोत्तराचा संकल्प येथील ग्रामस्थांनी हाती घेऊन केलेल्या या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांची अभिनंदन करणे सार्थकी ठरेल. यासाठी आपले सर्वतोपरी सहकार्य राहील असे विचार आमदार विठ्ठल हलगेकर यांनी व्यक्त केले.
नुकताच स्वर्गीय माजी आमदार प्रल्हाद रेमानी यांच्या जन्म गावी झाडनावगा येथे मंदिराचा कॉलम भरणे कार्यक्रम उत्साहात पार पडला. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा पंचायत सदस्य ज्योतिबा रेमानी होते .प्रमुख अतिथी म्हणून तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री विठ्ठल हलगेकर, माजी आमदार श्री अरविंद पाटील, भाजप तालुका अध्यक्ष श्री बसवराज सनिकोप, जिल्हा भाजपा उपाध्यक्ष श्री प्रमोद कोचेरी, माजी अध्यक्ष श्री संजय कुबल, भाजप नेते श्री बाबुराव देसाई, किरण येळूरकर, सुरेश देसाई सयाजी पाटील, मारुती पाटील, पंडित ओगले, प्रकाश गावडे, श्रीकांत Itagi, पत्रकार आप्पाजी पाटील, मल्लाप्पा मारीहाळ व गावातील भक्तगण महिला भगिनी उपस्थित होत्या.