
खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी: श्रीक्षेत्र पंढरपूर या ठिकाणी खानापूर तालुक्यातील कसबा नंदगड गावातील वारकरी व समस्त गावकऱ्यांनी पंढरपूर येथे भक्त निवास बांधण्याच्या संकल्प हाती घेतला असून आज एकादशीच्या निमित्ताने भक्ती निवासाचा भूमिपूजन हाती घेण्यात आला. यावेळी खानापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री विठ्ठल सोमाना हलगेकर यांच्या शुभहस्ते भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी गावकऱ्यांच्या हस्ते विठ्ठल रुक्माई ची मूर्ती देऊन आमदार साहेबांचा सत्कार करण्यात आला.

खानापूर तालुका भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष श्री विठ्ठल पाटील प्रधान कार्यकर्ते मल्लाप्पा मारीहाळ महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते श्री राजू पाटील ग्रामपंचायतचे माजी सदस्य प्रवीण पाटील विश्वास चव्हाण , कसबा नंदगड ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य गजानन पाटील भाजप नेते प्रशांत लकेबैलकर , नंदगड ग्रामपंचायतीचे माजी सदस्य राजू लकक्केबैलकर , बजरंग दल संघटक नंदगडचे गजानन कौंदलकर , संतोष चौधरी, तुकाराम पाटील गावचे सुप्रसिद्ध कीर्तनकार मारुती महाराज अनिल पाटील कसबा नंदगड गावातील वारकरी व समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष यल्लाप्पा पाटील होते