
पुणे: पुणेस्थित ग्रामीण बेळगाव व खानापूर तालुक्यातील क्रिकेट प्रेमी लोकांच्यासाठी खानापूर प्रीमियम लीग 2025 मर्यादित षटकांच्या फुल पीज क्रिकेट स्पर्धांचे आयोजन मंगळवार दि. 28 जानेवारी पासून आयोजित करण्यात आले आहे.
आकर्षक बक्षीसे ..
या पुणे (धायरी) येथील कोदरे पार्क, लोकमान्य प्रेस मागील मैदानात मंगळवार दि. 28 ,29 व 30 जानेवारी रोजी आयोजित खानापूर प्रीमियर लीग 2025 स्पर्धा करिता प्रथम क्रमांकाचे बक्षीस 31001, उद्योजक संतोष मनोहर वीर यांच्यातर्फे तर द्वितीय क्रमांकाचे बक्षीस 26,001 उद्योजक मारुती वाणी, तृतीय क्रमांकाचे बक्षीस 21001, उद्योजक नारायण गावडे, चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस 15,001 उद्योजक श्री आकाश पासलकर यांच्यावतीने ठेवण्यात आली आहेत.
अनेकांचा मदतीचा हात!
तीन दिवस चालणाऱ्या या क्रिकेट स्पर्धेसाठी खेळण्यात येणाऱ्या मैदानाचे पहिल्या दिवसाचे भाडे दत्ता पडळकर बालाजी कुंभार, दुसऱ्या दिवसाचे भाडे संजय होनापूरकर, अनिल झुंजवाडकर, यांनी तर तिसऱ्या दिवसाचे भाडे आप्पासाहेब जाधव या उद्योजकांनी देऊ केले आहे. तर युट्युब सेवा अनिल भुमकर ,प्रेमानंद गुरव या उद्योजकांनी स्वीकारली आहे. तीन दिवसीय क्रिकेट स्पर्धांच्या काळात येणाऱ्या स्पर्धकांसाठी शुग्रास भोजनाची सोय उद्योजक महादेव पाटील, नारायण कोलेकर, मिलिंद जाधव, सतीश शास्त्री या उद्योजकांनी घेतली आहे. याशिवाय अनेकांच्या मदतीचे हात या कामी लागले असून या क्रिकेट स्पर्धांच्या उद्घाटनासाठी स्पर्धेसाठी मदत केलेले देणगीदार, पुणे स्थित खानापूर बेळगाव मित्र मंडळ व स्थानिक राजकीय लोकप्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आहे. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी के पी एल चे अध्यक्ष रामू गुंडप, विनायक गुरव, रामदास घाडी, सचिन पाटील यासह संचालक मंडळ कार्यतत्पर आहे. तरी या स्पर्धांचा लाभ पुणे स्थित उद्योजक, व त्यांच्या परिवाराने घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.