खानापूर/ प्रतिनिधी : ग्रामपंचायतीच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाचे आरक्षण आता केवळ 48 तासावर उरले आहे. त्यामुळे खानापूर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सदस्यांचे याकडे लक्ष लागले आहे. जिल्हाधिकारी प्रांताधिकारी तसेच तहसीलदारांच्या उपस्थितीत खानापूर येथील पाटील गार्डनमध्ये सोमवार दि. 19 रोजी सकाळी दहा वाजल्यापासून आरक्षण प्रक्रिया राबवली जाणार आहे.
या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या लॉटरीसाठी तालुका प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. या ठिकाणी केवळ ग्रामपंचायत सदस्यांना प्रवेश दिला जाणार असून प्रत्येक सदस्यांनी येताना आपले ओळखपत्र घेऊन येणे सक्तीचे करण्यात आले आहे.
ग्रामीण भागाच्या विकासाचे केंद्रबिंदू असलेल्या ग्रामपंचायतीच्या प्रथम नागरिक पदासाठी होणारी ही लॉटरी आगामी तीस महिन्याचा कालावधी साठी राहणार आहे त्यामुळे अनेकानी आपल्याच गटाला आरक्षण येणार यासाठी चंग बांधला आहे. 1993 पासून पंचायत राज्य कायद्यानुसार ग्रामपंचायतीच्या आलेल्या आरक्षणाचा मागोवा लक्षात घेता तसेच पंचायतराज खात्याच्या निर्देशानुसार निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मार्ग सूची प्रमाणे अध्यक्ष उपाध्यक्ष पदाचा आरक्षण राहणार आहे. त्यामुळे अनेक वेळा सामान्य महिला अथवा सामान्य गटातून अध्यक्षपद आलेल्या पंचायतींना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण अनुसूचित जाती जमाती मागासवर्गीय वर्ग या गटात लोकसंख्या आधारावर आरक्षण संख्या राहणार आहे. त्यामुळे बहुतांश ग्रामपंचायती मध्ये सामान्यगटातूनच आरक्षणाची जागा राखीव असतात राहणार यात शंका नाही. त्यामुळे उद्या दि. 19 रोजी होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या दुसऱ्या टप्प्यातील अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या आरक्षण लॉटरीकडे तालुक्यातील 51 ग्रामपंचायतींच्या 623 सदस्यांचे लक्ष लागले आहे. शिवाय त्यांच्या पाठिराख्यांनी ही आपल्या प्रतिनिधीला अध्यक्षपद मिळावे यासाठी मोर्चेबांधणीला सुरुवात ही केली आहे. तालुक्यातील 51 ग्रामपंचायतीच्या पुढील तीस महिन्यांच्या कालावधीसाठी अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची लॉटरी झाल्यानंतर आगामी पंधरा दिवसात तालुका निवडणूक आयोगाकडून प्रत्येक ग्रामपंचायतीला निवडणूक प्रक्रिया हाती घेण्यासाठी वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. त्यामुळे जरी आज आरक्षण जाहीर झाले तरी पुढील पंधरा दिवस अध्यक्ष उपाध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया होई तोपर्यंत तालुक्यात मोर्चे बांधनी अथवा पळवापळवी व आमिषांना बळ येणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत नंतर अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडीची रणधुमाळी रंगतदार ठरणार यात शंका नाही.
ಖಾನಾಪುರ/ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿ ಅಧ್ಯಕ್ಷ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಈಗ ಕೇವಲ 48 ಗುಂಟೆ ಮೀಸಲು. ಹಾಗಾಗಿ ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನ ಗ್ರಾ.ಪಂ.ಸದಸ್ಯರು ಈ ಬಗ್ಗೆ ಗಮನ ಹರಿಸಿದ್ದಾರೆ. ಸೋಮವಾರ ಖಾನಾಪುರದ ಪಾಟೀಲ್ ಗಾರ್ಡನ್ ನಲ್ಲಿ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಹಾಗೂ ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಸಮ್ಮುಖದಲ್ಲಿ. 19ರಂದು ಬೆಳಗ್ಗೆ 10 ಗಂಟೆಯಿಂದ ಮೀಸಲಾತಿ ಪ್ರಕ್ರಿಯೆ ಜಾರಿಯಾಗಲಿದ್ದು, ಅಧ್ಯಕ್ಷ, ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಸ್ಥಾನದ ಕಮಲಕ್ಕೆ ತಾಲೂಕು ಆಡಳಿತ ಸಂಪೂರ್ಣ ಸಿದ್ಧತೆ ನಡೆಸಿದೆ. ಈ ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿ ಸದಸ್ಯರಿಗೆ ಮಾತ್ರ ಪ್ರವೇಶಿಸಲು ಅವಕಾಶವಿದ್ದು, ಬರುವಾಗ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಸದಸ್ಯರು ತಮ್ಮ ಗುರುತಿನ ಚೀಟಿ ತರುವುದನ್ನು ಕಡ್ಡಾಯಗೊಳಿಸಲಾಗಿದೆ. ಗ್ರಾಮೀಣ ಭಾಗದ ಅಭಿವೃದ್ಧಿಯ ಕೇಂದ್ರವಾಗಿರುವ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿಯ ಪ್ರಥಮ ಪ್ರಜೆ ಹುದ್ದೆಗೆ ಈ ಭಾಗ್ಯ ಮುಂದಿನ ಮೂವತ್ತು ತಿಂಗಳ ಕಾಲ ನಡೆಯಲಿದ್ದು, ತಮ್ಮ ಗುಂಪಿಗೆ ಮೀಸಲಾತಿ ಸಿಗುವ ನಿರೀಕ್ಷೆಯಲ್ಲಿ ಹಲವರು ಇದ್ದಾರೆ. 1993 ರಿಂದ ಪಂಚಾಯತ್ ರಾಜ್ಯ ಕಾಯಿದೆಯ ಪ್ರಕಾರ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿಗಳ ಮೀಸಲಾತಿಯನ್ನು ಗಮನದಲ್ಲಿಟ್ಟುಕೊಂಡು ಮತ್ತು ಪಂಚಾಯತ್ ರಾಜ್ ಇಲಾಖೆಯ ನಿರ್ದೇಶನದಂತೆ, ಅಧ್ಯಕ್ಷ ಮತ್ತು ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಸ್ಥಾನದ ಮೀಸಲಾತಿಯು ಚುನಾವಣಾ ಆಯೋಗವು ಘೋಷಿಸಿದ ಮಾರ್ಗ ಪಟ್ಟಿಯಂತೆ ಉಳಿಯುತ್ತದೆ. ಹಾಗಾಗಿ ಸಾಮಾನ್ಯ ಮಹಿಳೆ ಅಥವಾ ಸಾಮಾನ್ಯ ಗುಂಪುಗಳು ಹಲವು ಬಾರಿ ಅಧ್ಯಕ್ಷೆಯಾಗಿದ್ದ ಪಂಚಾಯಿತಿಗಳಿಗೆ ಮತ್ತೊಂದು ಅವಕಾಶ ಸಿಗುವ ಸಾಧ್ಯತೆಯನ್ನು ತಳ್ಳಿ ಹಾಕುವಂತಿಲ್ಲ.