IMG_20230720_155143

खानापुर /प्रतिनिधि;

ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया दिनांक वीस रोजी पार पडली या निवडणुकीत आगामी 30 महिन्याच्या कालावधीसाठी अध्यक्षपदी शीतल मशनू मडवळ (झाडनावगा) तर उपाध्यक्षपदी वैष्णवी विष्णू काद्रोळकर (कारलगा यांची बिनविरोध निवड झाली आहे. ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर अध्यक्ष कोण होणार याकडे हेब्बाळ ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांची लक्ष लागले होते. या पंचायतीवर अध्यक्ष पद अ’वर्ग महिला त उपाध्यक्ष पद सामान्य महिलांसाठी आरक्षण आले होते. यानुसार आज ग्रामपंचायतीच्या कार्यालयात निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये अध्यक्षपदासाठी शितल मष्णू मडवड झाडनावगा यांची तर उपाध्यक्षपदी वैष्णवी विष्णू काद्रोळकर यांची एकमताने निवड करण्यात आली.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य मल्लवा चंद्दू मादार , नंदा नागो केसरकर, प्रकाश गोपाळ गुरव, गीता गंगाराम कोलकार, दिलीप वेंकटेश चन्नेवाडकर, रूपाली अप्पाजी हडलगेकर, रवींद्र बाळाराम सुतार, संजय आनंद पाटील, पुष्पा पुंडलिक आळवणी, परशराम यल्लारी घाडी, अंकिता संदीप सुतार आदी उपस्थित होते यावेळी माजी आमदार व भाजप नेते अरविंद पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य ज्योतिबा रेमानी यांनी या ग्रामपंचायतीच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या बिनविरोध निवड साठी विशेष परिश्रम घेतले व उभयतांचे अभिनंदन केले. निवडूक अधिकारी म्हणून सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता राजेंद्र नाईक यांनी काम पाहिले. उपस्थितांचे स्वागत ग्रामपंचायती विकास अधिकारी आनंद भिंगे यांनी केले. यावेळी ग्रामपंचायतचे कर्मचारी व गावातील नागरिक उपस्थित होते.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us