
खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी:
गेल्या अनेक दिवसापासून रिक्त असलेल्या बरगाव ग्रामपंचायत उपाध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बरगाव येथील गोविंद हनुमंत पाटील यांची चुरशीने झालेल्या निवडणुकीत निवड झाली आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.

बरगाव ग्रामपंचायत उपाध्यक्ष प्रवीण पाटील यांनी राजीनामा देऊन बरेच ते पद रिक्त होतं. त्यासाठी आज मंगळवारी निवडणूक पार पडली. निवडणूक झालेल्या निवडणुकीमध्ये भाऊ गंगाराम पाटील कुप्पटगीरी तर श्री गोविंद हनमंत पाटील बरगाव निवडणूक शांततेत पार पडली. या निवडणुकीमध्ये गोविंद पाटील यांना सहा 6 मत तर भाऊ गंगाराम पाटील यांना 4 चार मतं पडली. यामध्ये गोविंद पाटील हे सहा मते घेऊन विजयी झाले. विजयी करण्यासाठी सर्व सदस्यांनी प्रयत्न केले.
त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी खानापूर pkps संचालक शंकर पाटील , बरगाव pkps चेअरमन कलाप्पा पाटील , माजी ग्रामपंचायत सदस्य रामा ल पाटील, एसडीएमसी उपाध्यक्ष गजानन पाटील, सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग हनुमंत पाटील, ग्रामपंचायत अध्यक्षा चांगुना पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पाटील, ग्रामपंचायत सदस्य यमुना सुतार, गोपिका मुतगेकर, ग्रामपंचायत सदस्या कविता निडगलकर आधी उपस्थित होते.