IMG_20250916_191316

खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी: चापगाव येथील सुप्रसिद्ध व नवसाला पावणारे दैवत भगवान श्रीकृष्ण मंदिरात येत्या 18 ऑक्टोबर रोजी दगडी गोमाता मूर्तीचे पूजन व प्रतिष्ठापना कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने दिनांक 17 ऑक्टोबर 2025 रोजी सदर दगडी गोमाता मूर्तीची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. दिनांक 18 रोजी सकाळी 11 वाजता भगवान श्रीकृष्ण मूर्तीच्या पाठीमागे गोमाता मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रम त्यानंतर मान्यवरांचे स्वागत व सत्कार कार्यक्रम झाल्यानंतर महाप्रसादाने या उत्सवाची सांगता होणार आहे.

चापगाव येथे भगवान श्रीकृष्ण मंदिर फोन्डेश्वर गल्ली मध्ये 13 वर्षांपूर्वी उभारण्यात आले आहे. या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाची उभी मूर्ती स्वरूपात उभी आहे. मात्र या मूर्तीच्या पाठीमागे गोमाता नसल्याने या भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीला पूर्ण स्वरूप आले नाही. त्यामुळे येथील श्रीकृष्ण उत्सव कमिटीच्या कार्यकर्त्यांनी मूर्तीच्या पाठीमागे गोमातेची मूर्ती उभारण्याचा निर्णय वर्षभरापूर्वी घेतला होता. त्यानुसार सदर दगडी सुंदर कोरी कामांमध्ये गोमातेची मूर्ती चापगाव येथील मूर्तिकारागार विठ्ठल सुतार व नागाप्पा सुतार यांनी बनवले आहे. सदर मूर्ती चे काम पूर्ण झाले असून येत्या 18 ऑक्टोबर रोजी मूर्ती मंदिरात प्रतिष्ठापित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला तालुक्यातील अनेक मान्यवर व देणगीदारांना निमंत्रित करून त्यांचा सन्मान केला जाणार आहे. या संदर्भात आज उत्सव कमिटीच्या कार्यकर्त्यांनी श्री आवरोळी मठाचे पूज्य श्री चेन्नई बसव देवरू यांच्या आशीर्वादाने त्यांचे कनिष्ठ बंधू कलैया स्वामी यांची भेट घेऊन प्रतिष्ठापनेचा मुहूर्त निश्चित केला आहे. यावेळी श्रीकृष्ण उत्सव कमिटीचे अध्यक्ष मारुती चोपडे, ज्येष्ठ सदस्य शंकर बेळगावकर संजय बेळगावकर, महादेव पाटील, गोविंद धबाले, मशनू बिरजे,मोहन यळगुकर यासह अनेकजण उपस्थित होते.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us