गोधोळी:
गोधोळी ग्रामपंचायतच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी गीता सोमलिंग बिरजे या बिनविरोध निवडून आले आहेत तर उपाध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत अशोक सोमलिंग पाटील यांची निवड झाली आहे या ग्रामपंचायतीच्या अध्यक्षपदाचे आरक्षण ब वर्गासाठी आले होते. तर उपाध्यक्ष पद सामान्य गटासाठी आले होते. यामध्ये अध्यक्षपदासाठी एकूण तीन अर्ज दाखल झाले. ब ‘वर्गासाठी आरक्षण आले असताना अ’ वर्गातील दोन सदस्यांनी या पदासाठी अर्ज दाखल केले होते. पण ते दोन्हीही अर्ज अवैद्य ठरले. त्यामुळे गीता सोमनिंग बिर्जे यांची अध्यक्षपदी थेट बिनविरोध निवड झाली.
उपाध्यक्ष पदासाठी झाली चुरस
उपाध्यक्ष पदासाठी चुरशीची निवडणूक झाली. या निवडणुकीसाठी एकूण तीन अर्ज दाखल झाले होते. यामध्ये अरुण रामचंद्र बेळगावकर, अशोक सोमनिंग पाटील, नारायण कल्लाप्पा कदम या तिघांनी सामान्य गटातून अर्ज दाखल केले होते. यापैकी नारायण कलाप्पा कदम यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे उर्वरित दोघांमध्ये चुरशीची निवडणूक झाली. यामध्ये एकूण दहा सदस्या पैकी अशोक सोमनिंग पाटील यांनी 6 मते घेतली. तर अरुण रामचंद्र बेळगावकर यांनी 4 मते घेतली. यामध्ये अशोक सोमनिंग पाटील यांची बहुमताने निवड झाली आहे.
या निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्य गुलाबी सुरेश सुतार, नारायण कल्लाप्पा कदम, नागेंद्र आप्पाराव जांबोटकर, संतोष गणपती राणे, ललिता परसराम चलवादी, यल्लुबाई सुरेश कापोलकर, रेखा श्रीकांत बुरुड सदस्य उपस्थित होते निवडणूक अधिकारी म्हणून कृषी सहाय्यक निर्देशक डीबी चव्हाण यांनी काम पाहिले. उपस्थितांचे स्वागत ग्रामपंचायत विकास अधिकारी हनुमंत पाटील यांनी मांडले. व नूतन अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला.