
खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
चापगाव ग्रामपंचायत क्षेत्रातील आल्लेहोळ येथील दैवत श्री मरेवा देवीचा त्रैवार्षिक गोंधळ कार्यक्रम आज मंगळवार दि. 18 व बुधवार दि. 19 मार्च रोजी साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या गोंधळ कार्यक्रमाच्या निमित्ताने आज मंगळवार दि. 18 रोजी सायंकाळी सहा नंतर रात्रभर धार्मिक विधी व विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री मरेवा देवी मंदिरासमोर धार्मिक विधी कार्यक्रम होणार आहेत. यानिमित्ताने उद्या बुधवार दि. 19 मार्च रोजी रात्री नऊ वाजता चार अंकी तमाशाप्रधान नाटक “डाळिंब टचकन फुटलं” या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. नाट्य प्रयोगात कोल्हापूर येथील कुमारी चेतना कोल्हापूरकर या नायिकेला पाचरण करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला आमदार माजी आमदार सह मान्यवर मंडळींना निमंत्रित करण्यात आले आहे.