खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद जी सावंत उद्या बुधवार दिनांक 17 रोजी खानापूर दौऱ्यावर येत आहेत. खानापूर नवीन बस स्थानकाजवळील मांगिरीश हॉल च्या पहिल्या मजल्यावर त्यांची बैठक होणार आहे. उत्तर कन्नड लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांच्या प्रचारार्थ ते खानापूर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख कार्यकर्ते बूथ प्रमुख व पदाधिकाऱ्यांची संवाद साधणार आहेत तरी खानापूर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी व बूथ प्रमुखांनी दुपारी 2 वाजता खानापूर मांगिरिश हॉल येथे उपस्थित रहावे असे आवाहन खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठल हलगेकर, अध्यक्ष संजय कूबल ,सेक्रेटरी गुंडू तोपिनकट्टी यांनी केले आहे.