Screenshot_2026-02-05-22-12-26-20_a23b203fd3aafc6dcb84e438dda678b6

प्रतिनिधी : खानापूर-

खानापूर, बेळगाव, हुक्केरी, निपाणी भागात तालुक्यात गेली 17 वर्षे सातत्याने ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून दहावी विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या व्याख्यानमाला सांगता समारंभ येत्या रविवार दि. 8 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रमात प्रतिवर्षाप्रमाणे तालुक्यातील अनेक नामवंत व्यक्तींना गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तरी सर्व स्तरातील शिक्षक वृंद, पालक वर्ग व विद्यार्थ्यांनी या सांगता कार्यक्रमात उपस्थित राहून शोभा वाढवावी अशी आवाहन ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानचे संस्थापक वास्तू विशारद, अधिवक्ते पीटर डिसोजा तथा ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानचे कार्यवाह बी. जे. बेळगावकर यांनी केले आहे.

दरवर्षी ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठान खानापूर च्या माध्यमातून दहावी विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमालेचे आयोजन डिसेंबर ते फेब्रुवारी पर्यंत केले जाते. यामध्ये खानापूर बेळगाव तसेच निपाणी भागात मराठी तसेच कन्नड विषयाच्या तज्ञ शिक्षकाकडून मार्गसूची पुस्तिका व विद्यार्थ्यांना व्याख्यानमाला केली जाते. या उत्कृष्ट कार्याला यावर्षी 17 वर्षे पूर्ण होत आहेत. कार्यक्रमात जिल्हा शिक्षण अधिकारी लीलावती वरिष्ठ सेवा मेडल विजेते कर्नल व्ही के डी पाटील, लोकमान्य शिक्षण संस्थेचे संचालक डॉक्टर डी. पी वागळे, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष डी. बी पाटील, पुणे येथील उद्योजक मारुती वाणी सह अनेक मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन केले जाणार आहे. या कार्यक्रमात दहावी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन ठरणाऱ्या प्रश्न पत्रिका संच चे प्रकाशन खानापूरचे गटशिक्षणाधिकारी पी. रामाप्पा, प्राचार्य शरयू कदम, डॉ. गोविंद मिसाळे, मंजुनाथ आळवणी, उद्योजक लक्ष्मण मोरे आदींच्या हस्ते केले जाणार आहे.

गौरव पुरस्कारांचे वितरण:

ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिवर्षी दिल्या जाणाऱ्या ज्ञानवर्धिनी गौरव पुरस्काराचा वितरण सोहळा यावेळी केला जाणार आहे. ज्ञानवर्धिनी ज्ञान रत्न पुरस्कार डॉ. स्नेहा कृष्णाजी देसाई, ज्ञानवर्धिनी गौरव पुरस्कार माचिगड येथील सुब्रमण्यम साहित्य अकादमी व खानापूर येथील मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानला दिला जाणार आहे. तर वैयक्तिक गटात समाजसेवा पुरस्कार नंदगड ग्रामपंचायतचे माजी अध्यक्ष यल्लाप्पा गुरव यांना तर ज्ञानवर्धिनी जीवन गौरव पुरस्कार माजी आमदार गुरुवर्य परशुराम भाऊ नंदीहळी यांना देण्यात येणार आहे.

कार्यक्रमाचे औचित साधून प्रतिष्ठानशी जोडल्या गेलेल्या माध्यमिक शाळांमध्ये 2025 मधील दहावी वार्षिक परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन व माध्यमिक शाळांमध्ये सेवा बजावून निवृत्त झालेल्या व व्याख्यानमालेच्या वेळी रिसोर्स पर्सन या नात्याने सेवा बजावणाऱ्या शिक्षकांचाही गौरव होणार आहे. कार्यक्रमाला अतिथी म्हणून भोजराज पाटील, पुंडलिक पेडणेकर, बी एस नावी, एस आर पाटील, डॉ. शुभांगी जगती, सी के पाटील, नामदेव पाखरे, बबन डेळेकर आदिनाथ निमंत्रित करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पीटर डिसोजा राहणार आहेत, तरी सर्वांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us