खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
- गेल्या 15 वर्षापासून खानापूर तालुक्यासह बेळगाव आदी भागात ज्ञानाची गंगा वाहणाऱ्या श्री ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठान च्या वतीने प्रतिवर्षी जाणारा समाज रत्न पुरस्कार यावर्षी राजकीय क्षेत्रातील एक प्रभावी व्यक्तिमत्व, तथा वेळोवेळी समाज हितार्थ धावून जाणारा देवदूत, राजकीय, सामाजिक शैक्षणिक तथा धार्मिक क्षेत्रातील दानशूर संकटकाळी धावून जाणारा देवदूत म्हणून ओळखले जाणारे तालुक्याचे माजी आमदार व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तथा मार्केटिंग सोसायटीचे चेअरमन कृषी पतीन मेरडा संस्थेचे विद्यमान चेअरमन श्रीमान अरविंद चंद्रकांत पाटील यांना जाहीर आहे. उद्या रविवार दि.18 फेब्रुवारी 2024 रोजी ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठान खानापूर तर्फे राबविण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या व्याख्यानमालांचा सांगता समारोप रावसाहेब वागळे पियू कॉलेज, लोकमान्य भवन, खानापूर या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या ठिकाणी सदर पुरस्काराचे वितरण तथा समाज क्षेत्रातील अनेक मान्यवरांचा सन्मान व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन असा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. प्रतिष्ठानच्या वतीने गेली १५ वर्षे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी, विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी या व्याख्यानमालांचे आयोजन केले जाते. या निमित्ताने गेल्या वर्षी इयत्ता दहावीमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या तालुक्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांचे सत्कार होणार आहेत. त्याचप्रमाणे या शैक्षणिक वर्षात निवृत्त झालेल्या सर्व मुख्याध्यापक, सहशिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह प्रतिष्ठानच्यावतीने दिला जाणारा समाजरत्न पुरस्कार पुरस्काराबरोबर ज्ञानरत्न पुरस्कार बेळगाव जी एस एस च्या प्राध्यापिका वैशाली भारती, तसेच खानापूर मराठा मंडळाचे प्रा. आय एम गुरव यांना व जीवनगौरव पुरस्कार खैरवाड चे सेवानिवृत्त शिक्षक रमाकांत पाटील यांना जाहीर करण्यात आला आहे. सदर पुरस्काराचे वितरण उद्या होणाऱ्या ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानच्या व्याख्यानमाला सांगता कार्यक्रमात विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत. प्रतिष्ठानचे अध्यक्ष पीटर डिसोजा यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला बेळगावचे जिल्हा शिक्षण अधिकारी मोहनकुमार हंचाटे, द. म. मंडळाचे सचिव विक्रम पाटील, यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना, शाळेशी निगडित विद्यार्थ्यी-पालकांना आणि निवृत शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानच्या या गौरव समारंभ तथा व्याख्यानमाला सांगता समारंभास उपस्थित राहावे असे आवाहन ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठान खानापूर यांच्यावतीने करण्यात आले आहे.