IMG-20241103-WA0045


खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:

उच्च शिक्षण हा जीवनाचा खरा पाया आहे. अलीकडच्या काळात शिक्षणाच्या विविध क्षेत्रात पदव्या प्राप्त करून कर्तव्यदक्ष अधिकारी, वकील, इंजिनीयर, डॉक्टर बनण्याचे स्वप्न अनेकांच्या अंगी असते. अशाच पद्धतीने आपल्या घरच्या प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षणाची आस धरत आपल्या कन्येने एखादी अधिवक्त्याची(B.A.LLB) (वकिली) पदवी प्राप्त केली,तर त्याचा आनंद द्विगणितच. अशाच पद्धतीने गर्लगुंजी येथील सर्वसामान्य कुटुंबात लहानाची मोठी झालेल्या कु. सुस्मिता साताप्पा पाटील या युवतीने नुकतीच वकिली पदवी मिळवून कर्नाटक राज्य सरकारची ‘सनद ‘ मिळवली आहे . यामुळे त्यांच्या घरच्या मंडळींचा आनंद द्विगुणित झाला. त्यातच मामांच्या प्रेरणे आपल्या भाचीने मिळवलेली ही पदवी आम्हा कुटुंबाला सन्मान व मान देणारी असल्याने तिचे यतोचित कौतुक व्हावे असे मत एखादा मामाला वाटले तर नवलच नव्हे, अशाच पद्धतीने गर्लगुजींच्या अशा या नवीन वकील झालेल्या कन्येचा मामेगावी मंतूरगा येथे यतोचित सन्मान तिचे मामा ईश्वर बोबाटे व त्यांच्या कुटुंबीयांनी केला. व सुकन्याने मिळवलेल्या सुखद यशाच्या कौतुकाची थाप तिच्या पाठीवर दिली.

रविवारी मणतुर्गा येथे ईश्वर बोबाटे व त्यांच्या परिवाराने आपल्या या भाचीचा सन्मान करण्यासाठी येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात एक छोटेखाणी कार्यक्रमाचे आयोजन केले. व सुस्मिताचा श्रीफळ शाल देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी खानापूर तालुका मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण कापोलकर, खानापूर तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष पिराजी कुराडे, दैनिक पुढारीचे प्रतिनिधी व तालुका पत्रकार संघटनेचे कार्याध्यक्ष वासुदेव चौगुले, ऋतिक कुंभार, गाव पंच कमिटी अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य सुधीर पाटील, sdmc सदस्य गजानन गुरव, माजी प्रधान परशराम देवलकर, वडील सात्ताप्पा दत्तात्रय पाटील, आई लक्ष्मी , हारूरीचे माजी ग्रामपंचायत सदस्य मर्याप्पा पाटील, पंच कमिटीचे अध्यक्ष, आधी उपस्थित होते. प्रारंभी उपस्थित यांचे स्वागत पत्रकार प्रल्हाद मादार यांनी केले. त्यानंतर ईश्वर बोबाटे व त्यांच्या परिवाराच्या वतीने सुस्मिता पाटील हिचा श्रीफळ शाल देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी बोलताना पत्रकार वासुदेव चौगुले यांनी, जीवनात शिक्षणाला महत्त्व आहे. उच्च शिक्षण हा प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबाचा कळस असतो. तो साकारण्यासाठी मनी असलेले जिद्द, घरातील कुटुंबाने शिक्षणासाठी गाळलेला घाम, व त्यांनी दिलेली प्रेरणा यातूनच आपलं एखादं मूल उच्च शिक्षणाची धाव घेतो, याचा आनंद त्याच्या कुटुंबीयांना नक्कीच असतो. त्याहूनही मामे गावाकडून मिळणारी प्रेरणा यशाची थाप ठरते. असे विचार मांडून तिला भविष्यात एक चांगल्या वकील बनण्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी नारायण कापोलकर, पिराजी कुऱ्हाडे, मर्याप्पा पाटील आदींनीही शुभेच्छा पर विचार मांडले.

यावेळी सत्काराला उत्तर देताना, ॲड सुस्मिता पाटील हिने माझ्या आई-वडिलांनी काढलेले कष्टाचे दिवस त्यातून मिळालेली प्रेरणा व शिक्षणाची घेतलेली जिद्द यासाठी घाम गाळून माझ्या पाठीशी उभे राहिलेल्या आई-वडिलांचे यामागे खरे प्रेरणा असून यात मामा व त्यांच्या परिवारांचा देखील मोठा महत्त्वाचा वाटा आहे. बी ए एल एल बी पर्यंतचे शिक्षण विश्वेश्वरय्या या विद्यापीठात घेताना आलेले कटू प्रसंग समोर ठेवून प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षणाची घेतलेली प्रेरणा अशीच विश्वासास पात्र राहून पूर्ण करून एक चांगली वकील बनण्याचा प्रयत्न करीन असे तिने यावेळी विचार मांडले.

गर्लगुंजी गावातील पहिली वकील :

गर्लगजी हे तालुक्यातील सर्वात मोठे खेडेगाव. या गावातून राजकीय पटलासह अनेक शिक्षक, डॉक्टर्स, सैनिक असे उच्च पदावर पोहोचलेले व्यक्ती आहेत. त्यामुळे या गावचे नाव राजकारणाबरोबर उच्च शिक्षणातही अग्रेसर आहे. पण एक उणीव होती ती म्हणजे वकिलीची. तेही स्वप्न कुमारी सुस्मिता पाटील या युवतीने पूर्ण केले आहे. कावड कष्टकरी असलेल्या सुस्मिताने वडिलांच्या बरोबर मातीचे गोळे करत लहानापासूनचे शिक्षण पूर्ण केले. आई सौ लक्ष्मी, वडील श्री साताप्पा पाटील हे शेतकरी कुटुंबातले. पण आपल्या दोन मुली व एक मुलगा ला शिक्षित बनवण्यासाठी त्यांच्या तळ हातावरच्या फोडांनी स्वस्त बसू दिले नाही. वडिलांचे काबाड कष्ट लक्षात घेऊन उच्च शिक्षण घेण्याची जिद्द मनी वळवून अनेक क्षेत्रे निवडली. पण त्यामध्ये वकिली करण्याची आवड ही वेगळीच होती. त्यामुळे जिद्दीच्या जोरावर बेळगाव विश्वेश्वरय्या विद्यालयातून बी ए एल एल बी पर्यंत शिक्षण पूर्ण केले. व कर्नाटक राज्य शासनाची सनद मिळवली आहे. आतापर्यंतच्या इतिहासात संपूर्ण गर्लगुंजी गावातून पहिली वकील म्हणून सदन मिळवलेली कुमारी सुस्मिता साताप्पा पाटील ही ठरली आहे. त्यामुळे तिचे गावातूनही कौतुक होत आहे.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us