IMG-20251206-WA0105

खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी :

गर्लगुंजी ग्रामपंचायत आणि खानापूर तालुका पंचहमी योजना अनुष्ठान समिती यांच्या वतीने कर्नाटक सरकारच्या महत्वकांक्षी पंचहमी योजनेचे शिबिर गर्लगुंजी येथे यशस्वी पार पडले.
अध्यक्षस्थानी गर्लगुंजी ग्राम पंचायत अध्यक्ष ललिता कोलकार उपस्थित होत्या,

ग्राम पंचायत सदस्य प्रसाद पाटील यांनी स्वागत करून प्रस्ताविक केले,पंच हमी योजनेचे तालुका अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांनी गृहलक्ष्मी,शक्ती, युवानिधी,गृहज्योती,अन्नभाग्य विषयी मार्गदर्शन केले
तालुक्यात गृहलक्ष्मी चे 128450000 येतात, काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीवेळी जी पंच हमी पक्षाने दिलेली होती तो शब्द सरकार आल्यावर पाळलेला आहे, पालकमंत्री सतीश जरिकोहोळी,माजी आमदार, एआयसीसी सचिव अंजली निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनुष्ठान कमिटी सुंदर कार्य करत आहे.

यावेळी बोलताना सूर्यकांत कुलकर्णी यांनी पंचहमी योजनेच्या विविध लाभांशांचा आढावा घेत महिलांशी संवाद साधला. महिलांच्या सबलीकरणासाठी राज्य सरकारने पंचहमी योजना राबवली असून, सर्व पात्र महिलांनी या योजनांचा लाभ घेऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत वर्षभर झालेल्या बचतीतून लघुउद्योग उभारून कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. यावेळी फलाणुभवी जयश्री कुंभार, निर्मला कोलेकर,मुक्ता मोरे,भाग्यश्री पाटील, संध्या पालकर यांनी पंच हमी योजनेची प्रशंसा केली. या योजनांचा लाभ सर्वसामान्यांना मिळत आहे याबद्दल आपले विचार मांडले यावेळी अनुष्ठान कमिटी सदस्य प्रकाश मादार,गोविंद पाटील,इसाकखान पठाण,सोनटक्के,त्याच बरोबर खानापूर डेपो मॅनेजर संतोष बेंकनकोप,एसीडीपीओ शारदा मराठे,सुपरवाइजर सुनीता मडीवाल,हेस्काम चे जावेद नाईकवाडी, अन्न वितरण विभागाचे जांगळे उपस्थित होते. गर्लगुंजी ग्राम पंचायत उपाध्यक्षा रेखा कुंभार सदस्य हणमंत मेलगे,अजित पाटील,सुरेश मेलगे, परशराम चौगुले,अनुराधा निट्टू रकर ,अन्नपूर्णा बुरुड,सविता सुतार अंगणवाडी कर्मचारी ग्राम पंचायत स्टाफ ,गावातील नागरिक उपस्थित होते. जयसिंग पाटील यांनी मार्गदर्शन केले, पिडीओ गांधी गावडा यांनी आभार मानले .

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us