खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी *
घोटगाळी ग्रामपंचायत मध्य दोन वर्षांपूर्वी झालेल्या कामांची तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी अधिकाऱ्यांच्या सहाय्यक पथकाने बुधवारी चौकशी करून कागदपत्रांची पडताळणी केली.
ग्रामपंचायत मध्ये नरेगा अंतर्गत गैरव्यवहार झाल्याची तक्रार दि 16 ऑक्टोबर 2021 रोजी घोटगाळी गावचे रहिवासी खेमराज सहदेव गडकरी यांनी बेळगाव येथील ओमबुडस मॅन ऑफिसला घोटगाळी ग्रामपंचायत मधील भ्रष्टाचार विषयी तक्रार दिली होती.
मनरेगा योजने अंतर्गत घोटगाळी ग्रामपंचायत मधील महिला सदस्यांच्या नवऱ्याने पत्नीच्या उपाध्यक्ष पदाचा गैरवापर करत स्वतः मनमानी कारभार करून बोगस रोजगाराच्या हजेऱ्या घालून कामाला न जाता त्यांच्या खात्यावर पैसे जमा केले. जमा केलेली रक्कम मटेरियल चे पैसे त्यांच्या खात्यावर जमा केलेत असे रोजगाराना सांगून परत मागून घेतल्या प्रकरणी खेमराज गडकरी यांनी तक्रार दिली होती, त्याची आज दि 02 ऑगस्ट 2023 रोजी घोटगाळी ग्रामपंचायत येथे चौकशी करण्यासाठी तालुका पंचायतचे कार्यकारी सहाय्यक अधिकारी श्री शेखर सोमन्नवर हजर होते.
घोटगाळी ग्रामपंचायत नेहमी चर्चेत असते. गैर कारभाराची दखल घेऊन एक प्रतिनिधीने काही दिवसा पूर्वी तक्रार केली होती. या चौकशी अंतर्गत घोटगाळी ग्रामपंचायत मधील भ्रष्ट दोषींना ₹3,88,890.50 पैसे दंडही ठोठावण्यात आला आहे.
याशिवाय खेमराज गडकरी यांनी गैर कारभारा बद्दल माहिती कायदा हक्क अंतर्गत दि 23 नोव्हेंबर 2021 रोजी अर्ज करून देखील अद्याप माहिती न दिल्याबद्दल अधिकारी यांच्या कडे परत तक्रार केली आणि ती माहिती मिळाल्यानंतरच कसून चौकशी व्हावी असे निवेदन केले असता अधिकारी यांनी लवकरात लवकर ती माहिती देण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी याना सूचना दिली. तसेच खेमराज गडकरी यांनी मागीतलेली संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर परत ग्रामपंचायत घोटगाळी येथे पुढील चौकशी करण्यात येईल अशी माहिती खेमराज गडकरी यांनी दिली.