1001129202

खानापूर:

येथील मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानने रविवारी (ता.२२) आयोजित केलेल्या प्रज्ञाशोध सामान्यज्ञान परीक्षेत माध्यमिक विभागात मराठा मंडळ हायस्कुलचा विजय दळवी तर प्राथमिक विभागात मिलाग्रीस चर्च शाळेची सन्मिता मारूती कुट्रे, रामगुरवाडी प्राथमिक शाळेची वैष्णवी विनायक ठोंबरे व गौरी हणमंत लाड हीने प्रथम क्रमांक पटकावला आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण कापोलकर आणि सचिव वासुदेव चौगुले यांनी दिली.

यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना शुक्रवार दि. २७ रोजी मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पारितोषीकांचे वितरण करण्यात येणार आहे. यावेळी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

माध्यमिक विभागात विजय दळवी (प्रथम), ताराराणी हायस्कुलच्या जान्हवी पाटील, निकिता चौरी (द्वितीय), ताराराणी हायस्कुलची सोनाली दळवी, लोंढा हायस्कुलची अक्षता गावकर (तृतिय), कणकुंबी माऊली विद्यालयचा शुभम गावडे, ताराराणी हायस्कुलची साक्षी गुरव, जांबोटी माध्यमिक विद्यालयची नियती गवाळकर, ताराराणी हायस्कुलची सारीका सुतार, जांबोटी माध्यमिक विद्यालयचा राजवीर इंगळे (चौथा क्रमांक), नंदगड कन्या विद्यालयची समृध्दी कंग्राळकर (पाचवा क्रमांक), कणकुंबी माऊली विद्यालयाचे आदित्य गुरव, दिप्तेश नाईक, धृव नाईक, ताराराणी हायस्कुलची श्वेता घाडी, अनुष्का पाटील, लोकोळी ज्ञानेश्वर विद्यालयची संपदा पाटील, नंदगड म.गांधी हायस्कुलची साक्षी होसुरकर, मणतुर्गा हायस्कुलची प्राची मादार, मराठा मंडळ हायस्कुलच चैतन्य गोरल (सहावा क्रमांक), प्रियांका येडगे (कौलापूर), मराठा मंडळची श्रेया गुरव, युवराज साबळे, पल्लवी पाटील, ओोलमणी राजर्षी शाहू हायस्कुलचा संकेत राऊत, ठिवठाण हायस्कुलचा पार्थ इश्राणी, कणकुंबी माऊली हायस्कुलचा साहील घाडी आणि प्राची गोरे (आठवा क्रमांक) यांनी यश संपदन केले आहे.

प्राथमिक विभागात मिलाग्रीस चर्च शाळेची सन्मिता मारूती कुट्रे, रामगुरवाडी शाळेची वैष्णवी विनायक ठोंबरे आणि जळगे शाळेची गौरी हणमंत लाड हीने प्रथम क्रमांक पटकावला आहे. मिलाग्रीस चर्च शाळेच्या राजनंदिनी शामराव पाटील, अमृता महेश पाटील, संहीता मल्लाप्पा पाटील, गर्लगुंजीची पूर्वा चांगदेव भातकांडे (द्वितीय), गणेश परशराम मळवकर (ओलमणी), सायली निंगाप्पा देसाई (खानापूर), नेहल नागेश हेब्बाळकर (मिलाग्रीस चर्च), वैभवी नागेश धबाले (गणेबैल) यांनी तृतिय क्रमांक पटकावला आहे.

मिलाग्रीस चर्चची स्वरा संतोष पाटील, इदलहोंडची प्रांजल संतोष चोपडे, हत्तरगुंजीची तनुजा विलास तिगडी (चौथा क्रमांक), मिलाग्रीस चर्चच्या आराध्या आप्पाजी पाटील, राधिका मल्लाप्पा गोरे, विजय मऱ्याप्पा धामणेकर, नारायण भिकाजी पाटील (पाचवा क्रमांक), कौलापूर येथील लक्ष्मी विठ्ठल फोंडे, गर्लगुंजी येथील दिग्वीजय मोहन भातकांडे, मिलाग्रीस चर्चचा रिध्दीश महेश गुरव, गायत्री सागर बिर्जे, भक्ती पांडुरंग सुतार, उर्वा पुंडलिक अंधारे, हलशीचा मधुसुधन कृष्णा पाटील, स्वप्ना गणपती पाटील (सहावा क्रमांक), मिलाग्रीस चर्च शाळेचा साईराज सुभाष गुंडपीकर, धनश्री दिनेश जांबोटकर, गणेबैलचा प्रशांत गणपती डेळेकर (सातवा क्रमांक), प्राविण्या परशराम शिवठणकर (हारूरी), मधू मल्हारी गुरव (गणेबैल), स्वराज्य संतोष पाटील (मिलाग्रीस चर्च), श्रृती भरमाणी गुरव (गणेबैल), दिप्ती तुळजाराम पाटील (गर्लगुंजी), क्रांती केशव दळवी (कबनाळी) आणि श्रेष्ठी भगिरथ घाडी (करंबळ) यांनी आठवा क्रमांक पटकावला आहे.

रविवारी (ता. २२) सदर परीक्षा मराठा मंडळच्या ताराराणी हायस्कुलमध्ये घेण्यात आली होती. यामध्ये माध्यमिक विभागात ४५० तर प्राथमिक विभागात ५५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विजेत्या विद्यार्थ्यांना मराठी भाषादिनी (ता.२७) पारितोषीकांचे वितरण करण्यात येणार आहे.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us