खानापूर लाईव्ह न्युज / प्रतिनिधी ; गर्लगुंजी प्राथमिक कृषी पतीन सहकारी संघाच्या पंचवार्षिक निवडणुक नुकताच चुरशीने पार पडली. त्यानंतर नवनिर्वाचित संचालक मंडळाची पहिली मासिक बैठक नुकतीच पार पडली या बैठकीमध्ये संस्थेचे नूतन अध्यक्ष म्हणून श्री राजाराम मारुती सिद्धांनी यांची तर उपाध्यक्षपदी सौ शामल संतोष पाटील बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
या संस्थेच्या झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत श्री माऊली देवी विकास पॅनलचे प्रतिनिधी निवडून संस्थेची ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली सदर निवडणूक पार पडल्यानंतर संस्थेच्या पहिल्या मासिक बैठकीत अध्यक्ष उपाध्यक्ष पदा साठी उभयतांची निवड करण्यात आली आहे. यावेळी संस्थेचे जेष्ठ संचालक. गोपाळराव मुरारी पाटील, पांडुरंग तुकाराम सावंत, सूभाष वसंतराव पाटील, हणमंत विठ्ठल मेलगे, संजय शंकर पाटील, विनोद विठ्ठल कुंभार, शांताराम शिवाजी मेलगे, महादेवी गुंडु सिद्धानी, शिवाजी व्यंकप्पा कोलकार, नागेंद्र तलवार संचालक मंडळासह गावातील अनेक ज्येष्ठ नागरिक व श्रमिक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी नूतन अध्यक्ष उपाध्यक्ष यांचे अभिनंदन करण्यात आले.