
खानापूर : तालुक्यातील लोंढा येथे श्री सिद्धिविनायक मंदिरात प्रति वर्षाप्रमाणे यावर्षीही श्री गणेश जन्मोत्सव कार्यक्रम उत्साहात साजरा करण्याचा निर्णय येथील उत्सव कमिटीने हाती घेतला आहे. निसर्गरम्य अशा उंच टेकडीवर असलेल्या या श्री सिद्धिविनायक मंदिरात प्रतिवर्षी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. येथील ट्रस्टी श्री बाबुराव देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या मंदिराचा उत्सव वाढत चालला आहे यावर्षीही तीन दिवसाचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सालाबाद प्रमाणे यंदाही श्री सिध्दीविनायक मंदिरात गुरूवारी दि.३० ते शनिवारी दि १.फेब्रुवारी पर्यत श्री गणेश जयंती साजरी होत आहे.
गुरुवारी दि.३० रोजी सकाळी ७ वाजता श्री मुर्तीला अभिषेक, ११ वाजता श्रीची पालखीतुन मिरवणुक शुक्रवारी दि.३१ रोजी सकाळी ७ वाजता अभिषेक, सकाळी १०.३० वाजता गणहोम. व सायंकाळी ७ वाजता डान्सस्पर्धा आयोजित करण्यात आले आहेत.
बिजली कडाडली नाट्यपयोग
दिनांक 31 रोजी रात्री रात्री ९ वाजता तीन अंकी सामाजिक नाटक बिजली कडाडली हा प्रयोग होणार आहे. यावेळी कार्यक्रमाला आमदार विठ्ठलराव हलगेकर व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी गणेशभक्तानी महाप्रसादाला तसेच इतर कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन ट्रस्ट कमिटी अध्यक्ष, माजी जि.प. सदस्य बाबूराव देसाई व श्री सिध्दीविनायक मंदिर ट्रस्ट कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.