IMG_20230712_113159

खानापूर /प्रतिनिधी : बेळगाव पणजी राष्ट्रीय महामार्गावरील गणेबैलं नजीकचा टोल सुरू करण्याचा पून्हा प्रयत्न महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यानी अवलंबला आहे. मंगळवारी भाजप नेत्यासह अनेक शेतकऱ्यांनी आंदोलन करून सुरू करण्यात येत असलेले टोल प्रक्रिया बंद पाडली होती. पण पुन्हा बुधवारी सकाळी टोल प्रक्रिया सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे कळताच करंबळ, खानापूर भागातील शेतकऱ्यांनी गणेबैल टोल नजीक जाऊन पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा देताच टोल थांबवण्यात आला. तरीही महामार्ग प्राधिकरण व संबंधित कंत्राटदरानी जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने पोलिसांच्या दबावाखातर गणेबैल टोलनाक्यावर वाहन कर वसुली प्रक्रिया सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. शेतकऱ्यांवर दबाव टाकून ही टोल हाती घेणे अन्यायकारक आहे. यासाठी वाहनधारक व शेतकऱ्यांनी अधिक कठोर होऊन वाहनकर टोल वसुली प्रक्रिया थांबवणे गरजेचे आहे. महामार्गात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना अद्याप पूर्णतः मोबदला मिळाला नाही. महामार्गाचे काम अर्धवट आहे, सर्विस रोडची पूर्तता नाही. अशा अनेक अडचणी असताना टोल सुरू करणे हे नियमबाह्य आहे. पण केवळ 16.2 किलोमीटर रस्ता पूर्ण झाल्याचे कारण पुढे करून वाहन कर टोल सुरू करण्याच्या हालचाली या शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचा प्रकार म्हणावा लागेल. यासाठी सकाळपासून शेतकरी गणेबैल टोल नाक्याजवळ ठाण मानून बसले असून कोणत्याही परिस्थितीत टोल सुरू करू देणार नाही अशा सज्जड इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. यावेळी खानापूर हत्तरगुंजी, होनकल, करंबळ , हलकर्णी आदी गावातील शेतकरी उपस्थीत होते.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us