गंदीगवाढ: येथे जगतज्योती बसवेश्वरांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण
गंदीगवाड: जगतज्योती श्री बसवेश्वर महाराजांनी समाजातील रूढीपरंपरा, वाईट चालीरीती यांना विरोध करून समाजाच्या हितकारक गोष्टींची अंमलबजावणी करणारी नवीन यंत्रणा तयार केली. बाराव्या शतकातील आदर्श प्रशासक ,समतेचे प्रणेते म्हणून महात्मा बसवेश्वरांना ओळखले जाते.सर्व प्रथम लोकशाही मूल्याची सुरूवात ही म.बसवेश्वरांनी 12 व्या शतकात अनूभव मंटपाच्या माध्यमातून केल्याचे वचन साहित्यातून दिसून येते.एकूणच त्यांनी वचनसाहित्यात समता,मूल्य,न्याय,बंधूता,एकात्मता तसेच स्वातंत्र्य,अधिकार ,नियंत्रण व शिस्त,सूशासन आणि प्रशासन आदी बाबींवर सखोल विवेचन केले आहेत. सद्यस्थितीत शासन व प्रशासनाला या विचारांचा अवलंब केल्यास निश्चितच देशात निर्माण होणारी विषमता, हिंसा,भेदभाव व जातीय राजकारण इ.समस्यावर पाय बंद घालण्यासाठी श्री बसवेश्वरांच्या वचनाची आचार विचारांची देवाण-घेवाण आजच्या समाजात रुजू झाली पाहिजे असे विचार राज्यसभा सदस्य इरांना कडाडी यांनी व्यक्त केले शुक्रवारी खानापूर तालुक्यातील गंदिगवाड येथे जगत ज्योती श्री बसवेश्वर महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरनप्रसंगी ते बोलत होते.
यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रयत संघटनेचे नेते व गावातील प्रतिष्ठित नागरिक अशोक यमकमरडी होते.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीचे नेते व महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते जगतज्योती श्री बसवेश्वर मूर्तीची पूजा करण्यात आली. यावेळी बोलताना विठ्ठल हलगेकर सर म्हणाले जगत ज्योती बसवेश्वर हा जगाचा आद्य गुरु आहे त्यांनी दिलेल्या वचनाने संपूर्ण समाजाला दिशा देण्याचे काम झाले आहे त्यामुळे जगद्गुरु बसवेश्वरांची वचने त्यांनी संपूर्ण जगाला दिलेला संदेश हा अनन्य साधारण आहे त्यामुळे बसवेश्वरांच्या आचार विचाराचे आचरण केले पाहिजे असे सांगून बसवेश्वरांची काही वचने त्यावेळी त्यांनी मांडली.
पूज्य श्री एन एम पी मडवाल राज योगेंद्र स्वामीजी कित्तूर, आवरोळी मठाचे मठाधीश चंनबसव देवरू, च्या दिव्य सानिध्यात मूर्ति चे लोकार्पण करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बेंगलोर महानगरपालिकेचे आयुक्त गिरीश होसुर, ग्रामपंचायत अध्यक्ष मल्लवा नायकर, माजी तालुका पंचायत सदस्य श्रीकांत इटगी, भाजप नेते सुभाष गुळशेट्टी भाजपा प्रधान कार्यदशी बसवराज सानिकोप, लैला साखर कारखान्याचे एम.डी. सदानंद पाटील, हनुमंत पाटील, सुंदर कुलकर्णी यासह अनेक जण उपस्थित होते