खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
श्री ब्रह्मचैतन सद्गुरू ह भ प तात्यासाहेब वासकर महाराज पंढरपूर यांच्या कृपाशीर्वादाने उद्या सोमवार दिनांक 30 डिसेंबर 2024 रोजी कसबा नंदगड येथील पोलीस स्थानकाजवळ ज्ञानयज्ञ गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा हा हा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सकाळी 9 वाजता पूजन व मान्यवरांच्या स्वागत कार्यक्रमानंतर या सोहळ्यात दुपारी 12पासून रात्री 10 वाजेपर्यंत अनेक प्रख्यात कीर्तनकारांची कीर्तने हरिपाठ प्रवचन नामजप असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. येथील भाजपाचे माजी अध्यक्ष व समाजसेवक श्री विठ्ठल कल्लाप्पा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या उद्घाटन कार्यक्रमात आमदार विठ्ठल हलगेकर माजी आमदार अरविंद पाटील यासह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी लैला कारखान्याचे एमडी सदानंद पाटील, भाजपचे नेते संजय कुबल, बाबुराव देसाई ,ज्योतिबा रेमानी काँग्रेसचे अध्यक्ष ईश्वर घाडी ,पीएच पाटील, पंडित ओगले यासह अनेक मान्यवर मंडळींना निमंत्रित करण्यात आले आहे. या कीर्तन सोहळ्यात दुपारी 12 वाजता ह भ प विठोबा सावंत निलावडा, त्यानंतर त्यानंतर ह भ प तुकाराम तांबीटकर गोधोळी, ह भ प गुरुभक्त मारुती महाराज कसबा नंदगड, ह भ प श्रीकांत पाळेकर बिडी यांचे कीर्तन होणार आहे. सायंकाळी 4 वाजता ह भ प मशणू जोशीलकर, ह भ प अर्जुन लाड, ह भ प शांताराम कुंभार, ह भ प तुकाराम पाटील, ह भ प मातृ वांद्रे यांचा हरिपाठ. त्यानंतर सायंकाळी 5 वाजता ह भ प नंदकुमार पाटील सर किरहलसी यांचे प्रवचन होणार आहे. सायंकाळी 6 वाजता ह भ प पांडुरंग महाराज देवकर घोटगाळी यांचे नामजप त्यानंतर सायंकाळी 7 ते 9 ह भ प युवा कीर्तनकार ह भ प विठ्ठल पाटील किरहलशी यांचे कीर्तन होणार आहे.
दिवसभर होणाऱ्या या भरगच्च कार्यक्रमात खानापूर तालुक्यातील अनेक वारकरी राजकीय मंडळींचे मोठे सहकार्य लाभले आहे. या कार्यक्रमात दुपारचा महाप्रसाद भाजपाचे माजी अध्यक्ष व समाजसेवक विठ्ठल पाटील यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. तरी या कार्यक्रमाचा लाभ सार्वजनिक आणि घ्यावा असे आवाहन युवा कीर्तनकार विठ्ठल पाटील व समस्त वारकरी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.