
चापगाव /प्रतिनिधी:
प्रतिवर्षाप्रमाणे महाशिवरात्रीच्या निमित्ताने श्री रामलिंगेश्वर देवस्थानच्या निमित्ताने वडेबैल ता. खानापूर येथे शुक्रवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता खळ्याच्या कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे. याचा पैलवान बंधूंनी लाभ घ्यावा असे आवाहन पंच कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी पंच कमिटीचे प्रमुख माजी अध्यक्ष मारुती पाटील मोबाईल नंबर+918722463119 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.