
खानापूर/ प्रतिनिधी: तालुक्याच्या विविध भागात सामाजिक सेवेचा उरत घेऊन काम करणाऱ्या वनवासी कल्याण संस्थेच्या वतीने खानापूर तालुक्यातील कडतन बागेवाडी ग्रामपंचायत या ठिकाणी मोफत आरोग्य चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराची चालना वनवासी कल्याणच्या बेंगलोर प्रोजेक्टर डायरेक्टर श्रीमती प्रतिमा देवी सी एस आर, डॉ. विकास पै, खानापूर, माजी जिल्हा पंचायत सदस्य सुरेश मॅगेरी, प्रदीप सुमन नंदगड , जिल्हा वनवासी कल्याणचे संयोजक बाबू शिंदे, वनवासी कल्याणच्या महिला प्रमुख श्रीमती लक्ष्मी जैन आदींच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

या शिबिराचा 146 शिबिर लाभ घेतला. सदर वनवासी कल्याण संस्था खानापूर तालुक्याच्या दुर्गम भागात ज्या ठिकाणी शैक्षणिकतेची सोय नाही, अशा ठिकाणी विद्यार्थ्यांना पाठ घडून देण्याचे काम करते. नागरगाळी इटगी, गंदीगवाड अशा अनेक ठिकाणी या संस्थेने आपले उपक्रम राबवले आहेत.