दिल्ली:
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना सायंकाळी उशिरा दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ते 92 वर्षांचे होते आणि अनेक दिवसांपासून आजारी होते.
मिळालेल्या माहितीनुसार, 2006 मध्ये मनमोहन सिंग यांची दुसऱ्यांदा बायपास सर्जरी करण्यात आली होती, त्यानंतर ते खूप आजारी होते. गुरुवारी त्यांना श्वास घेण्यास त्रास आणि अस्वस्थता जाणवू लागल्याने एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी गाह, पश्चिम पंजाब (आता पाकिस्तान) येथे झाला.
दरम्यान , कर्नाटकातील बेळगावी येथे सुरू असलेली काँग्रेस कार्यकारिणीची (CWC) बैठक रद्द करण्यात आली आहे. तसेच 27 डिसेंबर रोजी होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. राहुल गांधी आणि पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे बेळगावहून दिल्लीला रवाना झाले आहेत.