खानापूर / प्रतिनिधी: आजच्या वैज्ञानिक युगातही स्मशानभूमी म्हणजे भीती, धास्ती अन संशयाचे वातावरण असलेले ठिकाण. पूर्वीच्या काळात स्मशानभूमीला विशेष महत्त्व दिले जात होते. अन आजही आहे. पण अलीकडे स्मशानभूमी ही मयतावर अग्निसंस्कार करण्याइतपत योग्य मानली जाते. पण अशाच स्मशान भूमीत एखादी व्यक्ती रात्रभर झोपली असल्याचे निदर्शनाला आल्यास तर्क वितर्क व चर्चेला उधाण येतेच.
अशाच प्रकारे खानापूर शहरातील मलप्रभा नदी काठावर असलेल्या एका स्मशानभूमीत नकळत एक प्रकार घडला तो असा की, शहरांतर्गत जाणाऱ्या महामार्गापासून मलप्रभा नदीकाठावर चौगुले यांच्या शिवारात अंत्यसंस्कारासाठी शेड बांधण्यात आले आहे. रात्रीच्या वेळी दोन परदेशी पाहुणे( फॉरेनर्स )जात असताना त्यांना डूलकी आली. आणि त्यांनी आपली रात्र याच ठिकाणी काढावी असा विचार करून थेट त्या स्मशानभूमीत वास्तव केले. सोबत असलेल्या बुलेट दुचाकीसह वास्तवच मांडले,विशेष म्हणजे त्या दोन फॉरेनर्सनी आपल्या समवेत असलेल्या कापडी झोपाळ्याचा वापर थेट ्मशान भूमीतील अंत्यसंस्कारासाठी करण्यात आलेल्या लोखंडी चौथर्याला बांधून त्याच ठिकाणी आपले संपूर्ण साहित्य ठेवून रात्रभर झोपले. गुरुवारी पहाटेच्या सुमारास काही मॉर्निंग वॉकर्स त्या परिसरातून जात असताना स्मशानभूमीत दोघेजण झोपल्याची माहिती मिळताच तेही डचकून गेले. आणि त्यांनी ही बाब इतरांना सांगितली. एकंदरीत श्रद्धेत असलेल्या अनेक नागरिकांना स्मशानभूमी ही भुतांचे ठिकाण नसून ती एक निरव शांतता असलेली भूमी असल्याचे या फॉरेनर्सनी दाखवून दिले एकंदरीत सूर्योदयानंतर त्या दोन्ही फॉरेनर्स निवांतपणे आपला पुढचा रस्ता गाठला पण हा घडलेला प्रकार लक्षाच येताच चर्चेला मात्र उधाण आले.