खानापूर लाईव्ह न्युज:
अलीकडच्या काळात देवाचीही भीती नाही अशी माणसे जगात नाहीत असे म्हणता येणार नाही. कोण भक्ती भावे एक रुपयापासून मोठी रक्कम देवाच्या दानपेटीत गुप्तदान करतात. तर अनेक जण त्याच दानपोट्या चोरूनही नेतात. यापेक्षा वेगळे असे एकाने स्वतःच्या चेकवर शंभर कोटी रुपये लिहून दानपेटी तो चेक टाकला. अन व्यवस्थापन कमिटी ही आवक झाली. विशाखापट्टणमच्या सिम्हाचलम येथे श्रीवराह लक्ष्मी नरसिंहा देवस्थान आहे या मंदिरात नेहमी मोठ्या प्रमाणात दानपेटीत देणग्या येत असतात.
यानंतर मंदिर व्यवस्थापनातील पदाधिकारी धनादेश वठवण्यासाठी बँकेत पोहोचले. दानपात्रात जमा झालेला धनादेश कोटक महिंद्रा बँकेचा होता. बँकेत गेलेल्या मंदिर व्यवस्थापनाच्या पदाधिकाऱ्यांना धक्काच बसला. कारण 100 कोटी रुपयांचा धनादेश ज्या बँक खात्याशी संबंधित होता, त्यात केवळ 17 रुपये होते.
आता हे प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. 100 कोटांच्या धनादेशाचा फोटो सर्वत्र फिरत आहे. मंदिर व्यवस्थापनानं अद्यापपर्यंत या प्रकरणात कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. कोणीतरी मस्करी म्हणून धनादेश मंदिरातील दानपेटीत टाकला असावा असं बोललं जात आहे. अशा पत्रव्य लोकांना देवाची ह भीती नाही का, असा प्रश्न ही उपस्थित होतो.