
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित वनश्री हायस्कूल हलगा येथील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप आणि शुभेच्छा समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा मंडळाचे उपाध्यक्ष, दि खानापूर को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड चे डायरेक्टर श्री विठ्ठल निंगाप्पा गुरव हे होते.
शाळेच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात केली. प्रारंभी आपल्या प्रास्ताविकेतून शाळेचे मुख्याध्यापक एस. एन.सपाटे सरांनी कार्यक्रमाचे उद्देश स्पष्ट करत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन येणाऱ्या परीक्षेत यशस्वी होण्याचा मूलमंत्र सांगितला. 2024-25 या शैक्षणिक वर्षातील संपूर्ण घडामोडीचा आढावा किमती सुतार सरांनी आपल्या अहवाल वाचनातून घेतला यानंतर सर्व उपस्थित पाहुण्यांचं शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले.
प्रमुख वक्ते म्हणून टी.बी. मोरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेच्या विद्यार्थिनी समीक्षा होनावर, समीक्षा पाटील व स्नेहा फटान यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शिक्षकांच्या वतीने जी सी पाटील यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. शैक्षणिक वर्षात क्रीडा स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना उपस्थितांच्या वतीने पारितोषिक वितरण करण्यात आले.
या शैक्षणिक वर्षातील उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून सदैव पठाण आणि उत्कृष्ट विद्यार्थिनी म्हणून प्रणाली चुडेकर यांची निवड करण्यात आली तसेच मुलींची जनरल चॅम्पियनशिप मीनाक्षी पठाण हिने तर मुलांची जनरल चॅम्पियनशिप ज्ञानेश्वर आळवणी यांनी पटकावले.
प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या यशस्वी जीवनाकरिता आदर्शनच्या अवलंब केला पाहिजेत त्याचबरोबर जिद्द चिकाटी आणि मेहनत यांच्यात सातत्य ठेवला तर नक्कीच आपण यशस्वी होऊ असा कानमंत्र प्रमुख वक्ते म्हणून टीव्ही मोरे यांनी सर्व विद्यार्थ्यांना दिला त्याचबरोबर विविध उदाहरणा देऊन आपल्या जीवनातला आनंद कसं बनवता येईल त्याचबरोबर पालक आणि शिक्षक म्हणून आपापल्या भूमिका आपण योग्य तऱ्हेने बजावणे ही काळाची गरज आहे अशा शब्दांमध्ये सुंदर मार्गदर्शन सरांनी केले इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन त्यांनी प्रोत्सानासाठी बक्षीस सुद्धा देऊ केले.
शेवटी अध्यक्ष समारोप करतेवेळी विठ्ठल गुरव म्हणाले की, प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या मराठी शाळा टिकवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजेत भविष्यात वाटण करताना तुम्ही आपल्या शाळेने दिलेले संस्कार कधीही विसरता कामा नये. येणाऱ्या दहावीच्या परीक्षेत उज्वल यश संपादन करा व शाळेचा गौरव वाढवा असे सांगून त्यांनी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री ए. जे सावंत केले व आभार श्रीमती ए. ए पाटील यांनी मानले .