
खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगी स्वराज्य निर्मितीचे ध्येय होते, धर्मवीर संभाजी महाराजांच्या मध्ये धर्मनिष्ठा आणि जिद्द होती. म्हणूनच त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन आपण जगतो आहोत, अशाच पद्धतीने प्रत्येक विद्यार्थ्याने देखील आपल्या मनी ध्येय व चिकाटी वृती राखून आपण यशाचे पाऊल राखणार याची जिद्द मनी ठेवली पाहिजे. राजमाता जिजाऊनी दिलेली प्रेरणा छत्रपती शिवरायांनी आणि कौशल्याची पराकष्टा धर्मवीर संभाजी महाराजांनी जशी राखली त्याच पद्धतीने आजच्या युवा पिढीने देखील धर्म, रितीरिवाज आणि यशाची चिकाटी मनी ठेवून आपल्या शैक्षणिक जीवनात उत्तुंग भरारी घेतल्यास भविष्यात जीवन सार्थकी जाईल, आणि समाजात एक मानाचे स्थान प्राप्त करण्यात आपण कधीही मागे राहणार नाही त्यासाठी प्रत्येकाने जीवनात सातत्य राखले पाहिजे असे विचार खानापूर रावसाहेब वागळे महाविद्यालयाचे प्रा शंकर गावडा यांनी व्यक्त केले.

दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित चापगाव येथील मलप्रभा हायस्कूल मध्ये मंगळवारी दहावी विद्यार्थ्यांचा सदिच्छा सोहळा व बक्षीस वितरण कार्यक्रम पार पडला यावेळी ते प्रमुख वक्ते या नात्याने बोलत होते. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष पत्रकार पिराजी कुऱ्हाडे होते.
प्रारंभी उपस्थितांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक पी बी पाटील यांनी यांनी करून कार्यक्रमासंदर्भात माहिती दिली. कार्यक्रमात दीप प्रज्वलन ग्रामपंचायतचे माजी अध्यक्ष व शाळा कमिटीचे उपाध्यक्ष रमेश धबाले, मंडळ पंचायतीचे माजी उपप्रधान व शाळा कमिटीचे सदस्य विजय कडबी, यांच्या हस्ते तर महात्मा ज्योतिबा फुले प्रतिमेचे पूजन शाळा व्यवस्थापन कमिटीचे सदस्य महादेव हंगिरेकर, अनिल बेळगावकर यांच्या हस्ते झाले. अहवाल वाचन सहशिक्षक नंद्याळकर यांनी केले. त्यानंतर विद्यार्थ्यांची निरोप देणारी व निरोप घेणारी अनेकांची भाषणे झाले.
यावेळी बोलताना उपाध्यक्ष रमेश धबाले यांनी विद्यार्थ्यांनी उज्वल भविष्य घडवण्यासाठी तसेच आई-वडील व गुरुजनांचा आदर राखत प्रत्येक विद्यार्थ्याने कलागुणांसह अभ्यास वृत्ती जपावी असे आवाहन केले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना पत्रकार पिराजी कुऱ्हाडे म्हणाले, प्रतिवर्षी दहावीच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या मार्फत सदिच्छा दिल्या जातात, भविष्यात प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या उत्तुंग भरारीची झेप घेत. सुजान नागरिक बनण्यासाठी जिद्द व चिकाटी व अभ्यासूर्ती जपावी. व शाळेचे नाव उज्वल करावे असे प्रेरित केले. कार्यक्रमात शाळा व्यवस्थापन कमिटीचे सदस्य महादेव हंगीरगेकर , सहशिक्षिका काकतकर ,वर्गशिक्षक जी पी पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. शेवटी शारीरिक शिक्षक केसरकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुकाराम सनदी यांनी केले.
आदर्श विद्यार्थिनी गौरी पाटील तर आदर्श विद्यार्थी म्हणून नागराज सनदी यांची निवड!
या कार्यक्रमाचे अवचित साधून शाळेच्या विविध क्षेत्रात चॅम्पियनशिप व क्रीडा क्षेत्रात बक्षीस मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. त्याचप्रमाणे 2024- 25 वर्षातील मलप्रभा हायस्कूलचा आदर्श विद्यार्थी म्हणून यडोगा येथील नागराज नारायण सनदी तर आदर्श विद्यार्थिनी म्हणून वडेबैल येथील गौरी ज्योतिबा पाटील यांची निवड करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
