खानापूर /प्रतिनिधी :
पुणेस्थित उद्योजक व बीपीएल फाउंडेशन ट्रस्ट पुणे चे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते श्री दत्ताभाऊ भेकणे (हेब्बाळ) त्यांच्या मातोश्री सुभद्रा मर्याणी भेकणे (वय 85) यांचे पुणे निवासी शुक्रवार दि. 22 रोजी दुपारी बारा वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. पश्चात मुलगा सून, विवाहित मुलगी, नातवंडे असा परिवार आहे त्यांचा अंत्यसंस्कार उद्या शनिवार दि. 23 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता हेब्बाळ येथे मूळगावी होणार आहे.