खानापूर : कर्नाटक राज्य सरकार ने वक्फ आदालत कायदा जारी करून सर्वसामान्यांच्या जमिनी व बोर्डाला कब्जा करण्यासाठी दिलेला अंतरिम आदेश हा अत्यंत चुकीचा असून यामुळे अनेक वर्षापासून असणाऱ्या जमीन मालकांना याचा त्रास होणार आहे. कर्नाटक राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारच्या जमिनीवर व बोर्डाची नावे दाखल झाल्याने शेतकऱ्या अडचणीत आले आहेत. दिन दलिसासह सर्वसामान्यांच्या जमिनी बळकावण्याचा हा एक प्रकारचा डाव असून कायद्याच्या विरोधात भाजपाने आंदोलन हाती घेतले आहे. त्याचाच एक भाग म्हणून खानापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार कार्यालयावर एक मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन सादर केले.
खानापूर तालुका भारतीय जनता पार्टी च्या वतीने सोमवारी येथील लक्ष्मी मंदिर पासून तहसीलदार कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढला. व तहसीलदारांना एक निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार विठ्ठल हलगेकर म्हणाले, भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा पाकिस्तानी मुसलमानांच्या भारतातील जमिनी वक्फ बोर्डाच्या ताब्यात देण्यात आल्या. देशभरात नऊ लाख हेक्टर जमीन वक्फ बोर्डाच्या नावे करण्यात आली.. 1973 च्या ट्रिब्युनल कायद्याअंतर्गत अनेक शेतकऱ्यांना कसणाऱ्या जमिनी मिळाले आहेत. आज सरकारने काढलेल्या वक्फ आदालत आदेशाप्रमाणे चौकशी समोर आली की कसणाऱ्या अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीवर बोर्डाची नावे येऊ शकतात. त्यासाठी आत्ताच शेतकऱ्यांनी सतर्क राहून या कायद्याला विरोध करणे गरजेचे आहे. याचाच एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टीने संपूर्ण राज्यभरात एक आंदोलन हाती घेतले आहे,असे त्यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार अरविंद पाटील भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी , अधिवक्ते चेतन मनेरिकर ,भाजपा तालुका अध्यक्ष बसवराज सानिकोप, प्रधान कार्यादेशी मल्लाप्पा मारीहाळ आदींनी यावेळी या कायद्याला विरोध करणारी भाषणे केली. प्रारंभी येथील लक्ष्मी मंदिर पासून शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत घोषणाबाजी करत या कायद्याविरोधात निषेध नोंदविला व त्यानंतर तहसीलदार प्रकाश गायकवाड यांना एक निवेदन सादर करून ह्या कायदा तत्काळ रद्द करावा अशी मागणी केली. यावेळी भाजप नेते बाबुराव देसाई, सदानंद पाटील, नगरसेवक आप्पा या कोडोली, सुंदर कुलकर्णी, राजेंद्र रायका, गुंडू तोपिनकटी, किशोर हेबाळकर, सयाजी पाटील, लक्ष्मण झांजरे, सदानंद होसुरकर, मनोहर कदम, सिद्धू पाटील, गजानन पाटील, यशवंत गावडे, यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.