खानापूर /प्रतिनिधी ;
खानापूर तालुका हा विस्ताराने अधिक मोठा आहे. त्यात जांबोटी तसेच लोंढे जिल्हा पंचायत सारख्या दुर्गम भागामध्ये अनेक गावांना मतदान केंद्राची सोय नसल्यामुळे बहुतांश गावांमध्ये आठ ते दहा किलोमीटर येऊन दुसऱ्या मतदान केंद्रावर मतदान करावे लागते. या समस्येची दक्षता का लक्षात घेता खानापूर तालुक्यात आणखी किमान 50 आगामी निवडणुकीत मंजूर करण्यासंदर्भात प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय तहसीलदार कार्यालयात बैठकीत चर्चित करण्यात आला. तहसीलदार प्रकाश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली दोनच दिवसांपूर्वी सदर बैठक पार पडली.
या बैठकीत मतदान केंद्रे बहुसंख्य गावांमध्ये मतदान केंद्राची सोय नसल्याने सात ते आठ कि.मी.वर असलेल्या दुसऱ्या गावातील केंद्रावर जाऊन मतदान करावे लागते. यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. तसेच मतदानाच्या टक्केवारीवरही परिणाम होत असल्याचे दिसून आल्याने ‘गाव तेथे मतदान केंद्र’ या संकल्पनेतून मतदान केंद्रापासून वंचित असलेल्या उर्वरित 150 गावांमध्ये नव्याने मतदान केंद्राची सोय करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना निर्णय तहसीलदार कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
तालुक्यातील विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. तालुक्यात 255 मतदान केंद्रे अस्तित्वात आहेत. अनेक गवळीवाडे आणि लहान गावे मतदान केंद्राच्या सुविधेपासून वंचित आहेत. त्यामुळे जंगगलातून पायपीट करत त्यांना मतदानासाठी दुसऱ्या गावात जावे लागत होते. लोकाभिमुख नाही. निवडणुका ही संकल्पना साकारण्यासाठी निवडणूक विभागाने मतदार आणि मतदान यांच्यातील सर्व अडथळे दूर करण्याचा प्रयत्न चालविला आहे. नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील मतदानावेळी दुर्गम भागातील जनतेला इतरत्र जाऊन मतदान करावे लागले. एका मतदान केंद्रावर एकापेक्षा अधिक गावच्या नागरिकांना अवलंबून राहावे लागते. मतदान केंद्रासाठी लागणारी पूरेशी व्यवस्था गावात उपलब्ध असताना मतदान केंद्राची मात्र सोय या समस्येवर चर्चा करून नवीन 50 मतदान केंद्रांच्या गावांची यादी तयार करून ती जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास तालुक्यातील एकही गाव मतदान केंद्रापासून वंचित राहणार नाही. भीमगड अभयारण्यात वसलेल्या कृष्णापूरसारख्या अवघ्या मतदार असलेल्या गावातही मतदान केंद्राची व्यवस्था करण्याची शिफारस या प्रस्तावात करण्यात आली आहे.
बैठकीला राजेंद्र रायका, गुंडू तोपिनकट्टी, महादेव कोळी, परवेज टेकडी, प्रकाश मादार, लियाकत अली बिच्चनावर, शरद होनकांडे यांच्यासह उपतहसीलदार वैजू मँगेरी, के. आर. कोलकार, सुनिल देसाई आधी उपस्थित होते.