खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
तालुक्यातील इदलहोंड येथील प्राथमिक कृषी पतीन सहकारी संघाची पंचवार्षिक निवडणूक नुकताच चुरशीमध्ये पार पाडली . त्यानंतर आज बुधवारी कृषी पतीन सहकारी संघाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवड झाली. यामध्ये ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष व नवनिर्वाचित कृषी पतीन सहकारी संघाचे संचालक चांगाप्पा बाचोळकर यांची एकमताने अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी नवनिर्वाचित संचालक सुभाष कुंभार यांची निवड करण्यात आली आहे. या उभयतांच्या निवडीबद्दल सर्व संस्थेच्या भागधारकातून व ग्रामस्थातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
या संदर्भात संस्थेच्या कार्यालयात आज नवनिर्वातीस संचालकांची पहिली बैठक पार पडली. यावेळी नवनिर्वाचित सदस्य किरण पाटील ,संजय जाधव, बाळाराम निलजकर डॉ. बसवंत इदलहोंडकर, विष्णू पाखरे, चन्नाप्पा बाळनावर, नामदेव पाखरे, संचालिका सुनीता पाटील, रुक्मिणी गुरव यासह इतर संचालक उपस्थित होते. उभयतांचे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व माजी आमदार अरविंद पाटील यांनी अभिनंदन केले आहे.