खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी ;
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने सालाबादप्रमाणे नवरात्र उत्सवात दुर्गादेवीचे आयोजन मोठ्या प्रमाणात केले जाते खानापूर शहरासह तालुक्याच्या विविध भागांमध्ये या दुर्गादेवीचे आयोजन गुरुवारी करण्यात आले पुढील दहा दिवस म्हणजे 12 ऑक्टोबर पर्यंत सदर दुर्गाजवळ दररोज विविध मार्गावरून धावणार आहे. खानापूर शहरात या दुर्गा देवीचा प्रारंभ आज सकाळी शिवस्मारक चौकातून करण्यात आला. राजा शिवछत्रपती ंना अभिवादन झाल्यानंतर सदर दुर्गा दौड नीगापूर गल्ली, लक्ष्मी मंदिर, चिरमुरकर गल्ली, कडोलकर गल्ली, चौरासी मंदिर, दादोबा नगर संभाजी महाराज स्मारक, घाडी गल्ली, गुरव गल्ली, बस्ती गल्ली , सातेरी माऊली मंदिर या ठिकाणी येऊन समाप्ती झाली. या दुर्गादौडीत अबाल वृद्धा सह युवती महिलांनी मंडळींनी मोठ्या हिरीरीने भाग घेतला होता.