बेंगळुरू: कर्नाटक राज्यातील घेण्या अनेक काळापासून प्रलंबित असलेल्या तसेच बहुचर्चित असलेल्या जिल्हा पंचायत व तालुका पंचायतीच्या निवडणुका येत्या एप्प्रिल किंवा मे महिन्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे राज्य निवडणूक आयुक्त जी.एस. संगरेशी यांनी सोमवारी बेळगाव येथे सांगितले. निवडणुका इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांऐवजी (EVMs) मतपत्रिकांच्या माध्यमातून घेण्याचा विचार केला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
काल उपजिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते. “राज्य सरकारने विविध मतदारसंघांसाठी आरक्षण निश्चित केल्यानंतर निवडणुका जाहीर केल्या जातील,” असे ते म्हणाले. मतदारसंघांच्या फेररचनेमुळे जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायत निवडणुका उशिरा होत आहेत.
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांविरोधात अनेक वर्षांपासून सर्व पक्षांनी आक्षेप नोंदवले आहेत. “प्रक्रिया कार्यक्षम आणि पारदर्शक असावी जेणेकरून कोणालाही शंका वाटणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. सामान्य जनतेला निवडणुकांशी संबंधित कोणत्याही गोष्टीबद्दल शंका वाटू नये, यासाठी आपण प्रयत्नशील राहिले पाहिजे. SEC मतपत्रिकांचा वापर करून निवडणुका घेण्याचे स्वातंत्र्य बाळगते आणि सल्लामसलतीनंतर त्याचा विचार केला जाईल,” असे ते म्हणाले. वन नेशन, वन इलेक्शन’ धोरणाबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, हे धोरण प्रजातांत्रिक पद्धतीने, सखोल चर्चा झाल्यानंतरच ठरवले जावे. “हे एखाद्या किंवा काही व्यक्तींनी ठरवण्याचे प्रकरण नाही. त्यावर प्रत्येक गाव आणि शहरात चर्चा होणे गरजेचे आहे,” असे ते म्हणाले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार वनकेरी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.