- खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी: माणसाकडे कोणतेही काम करण्याची दृढ इच्छाशक्ती ही यशाचे शिखर बनते आपल्या देशात अनेक परंपरागत व्यवसाय आहेत ते परंपरेनुसार चालत असले तरी अलीकडच्या काळात कालबाह्य होताना दिसत आहेत. पण एखाद्या उत्तुंग क्षेत्रात आपल्या मागील पिढ्यांनी सांभाळलेला व्यवसाय हा पुढील पिढीने सांभाळण्याची ताकद व दृढ इच्छाशक्ती ही क्वचितच बदलत्या शिक्षणात वेगवेगळे उद्योग व्यवसाय करत अनेक जण मार्ग पण अशा काही गोष्टीला अपवादात्मक लोक आपली पिढी जात परंपरा कायम ठेवत पुढे जाताना दिसतात अशाच बेळगाव कडोलकर गल्लीत आपला व्यवसाय थाटलेल्या साठे कुटुंबातील वैद्यकीय व्यवसायात काम करणाऱ्या पिढीने मात्र वैद्यकीय सेवेची परंपरा कायम राखली आहे. अशासाठी परिवारातील सतत चौथी पिढी कार्यरत असणाऱ्या विद्यमान दंत चिकित्सक वैद्यकीय सेवा बनवणाऱ्या डॉक्टर राहुल साठे डॉक्टर वर्षासाठी यांचा सन्मान इंडियन डेंटल असोसिएशन यांच्या वतीने करण्यात आला.
- सदर साठे कुटुंबीय बेळगाव साठी अतिशय भूषणावह ठरले आहे साठे परिवाराच्या 100 वर्षाच्या वैद्यकीय प्रवासाचा आढावा घेऊन या परिवाराला सन्मानित करण्यात आले.
- होटेल सी रॉक मध्ये नुकत्याच आयोजित केलेल्या कार्यक्रमात डॉ.यु.एस.शशिधर मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच व्यासपीठावर शाखेचे अध्यक्ष डॉ राधाकृष्ण हारवाडेकर, सचिव डॉ.बिंदू होसमनी व खजिनदार डॉ सुशांत नाझरे उपस्थित होते.
- शाखेचे अध्यक्ष डॉ राधाकृष्ण हारवाडेकर यांनी डॉ.साठे परिवाराचा परिचय करून दिला. यावेळी बोलताना ते म्हणाले, तब्बल 100 वर्षांपूर्वी 1924 साली डॉ.के.व्ही.साठे यांनी आधी अनंतशयन गल्ली व नंतर कडोलकर गल्लीत आपला दवाखाना सुरू केला. त्यानंतर डॉ.अशोक साठे व डॉ.गजानन साठे यांनी आपली कारकीर्द सुरू केली. त्यानंतर डॉ उदय साठे हे पथालाजिस्ट म्हणून चार दशके नावलौकिक मिळविला.या कुटुंबातील आणखी एक अवलिया म्हणजे डॉ.शशांक साठे.त्यानंतर आता चौथ्या पिढीचे शिलेदार म्हणजे डॉ.राहुल साठे व डॉ. वर्षा साठे हे दोघेही प्रख्यात दंतवैद्य आहेत.
- अशा या चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व असणाऱ्या साठे परिवाराचे प्रतिनिधित्व बजावणारे डॉ.राहुल साठे व डॉ. वर्षा साठे यांना या कार्यक्रमात विशेष निमंत्रित म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्या घराण्याने राखलेली ही परंपरा व त्यांच्या कार्याची दखल लक्षात घेता शाखेचे जेष्ठ सदस्य डॉ.यु.एस.शशिधर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
- शाखेचे मानद सचिव डॉ.बिंदू होसमनी यांनी उपस्थितांचे आभार मानले. डॉ.साईचांदणी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला शाखेचे सर्व सदस्य उपस्थित होते.