IMG_20241029_163923

खानापूर लाईव्ह न्युज/
1 नोव्हेंबर काळ्यादिनी कडकडीत हरताळ पाळण्याचे आवाहन खानापूर म. ए. समिती च्या वतीने करण्यात आले आहे . रविवारी येथील शिवस्मारकात समितीची बैठक झाल्यानंतर गावागावात पत्रकांचे वाटप करून जागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता यानुसार आज मंगळवारी जांबोटी येथे पत्रकांचे वाटप करण्यात आले.
केंद्र सरकारने भाषावार प्रांत रचना करून 1 नोव्हेंबर 1956 रोजी बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी आदी बहुसंख्य मराठी भाषिक प्रदेश अन्यायाने कर्नाटक राज्यात डांबण्यात आल्यामुळे बहुसंख्य मराठी भाषिकावर अन्याय होत आहे. गेल्या 67 वर्षापासून सीमाभागातील मराठी भाषिक जनतेची महाराष्ट्रात सामील होण्याची इच्छा अद्यापही कायम असून सीमाभागातील मराठी जनता दरवर्षी बेळगावसह सीमाभागात 1 नोव्हेंबर या दिवशी काळा दिन पाळून सर्व व्यवहार बंद ठेवून निषेध व्यक्त करते. यावर्षी देखील 1 नोव्हेंबर या काळ्या दिनी सर्व व्यवहार बंद ठेवून कडकडीत हरताळ पाळावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले . यावेळी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, चिटणीस आबासाहेब दळवी, गोपाळ पाटील राजाराम देसाई, संजीव पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य जयराम देसाई, यासह या भागातील विठ्ठल पाटील रवींद्र देसाई, वसंत नावलकर, माजी तालुका पंचायत सदस्य पुंडलिक पाटील, पुंडलिक भरणकर, सहदेव नाईक भास्कर बिर्जे, कृष्णा महाजन, शामराव देसाई, मारुती मादार चांगाप्पा देसाई यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

खानापूर शहरातही पत्रकांचे वाटप!

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने रविवारी खानापूरात पत्रकांचे वाटप करून जनजागृती करण्यात आली व काळादिन गांभीर्याने पाळण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी माजी आमदार दिगंबर पाटील, तालुका समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, सचिव आबासाहेब दळवी, गोपाळ पाटील ,कार्याध्यक्ष मुरलीधर गणपतराव पाटील, खजिनदार संजीव रामचंद्र पाटील, प्रकाश विठ्ठलराव चव्हाण, बाळासाहेब महादेव शेलार, पांडुरंग सावंत, रमेश देसाई, भीमसेन कल्लाप्पा करंबळकर, जगन्नाथ लक्ष्मण देसाई, राजाराम साताप्पा देसाई, मोहन रामू गुरव, ब्रह्मानंद जोतिबा पाटील, म्हात्रु नारायण धबाले, सुनील मुरारी पाटील, सदानंद राजाराम पाटील, अमृत बडकू पाटील, गंगाराम सहदेव पाटील, रुक्माणा शंकर झुंजवाडकर, पुंडलिक रामचंद्र पाटील, शामराव कल्लोजीराव पाटील, कल्लाप्पा प्रल्हाद कोडचवाडकर, डी. एम. भोसले, रमेश मल्हारी धबाले, ऍड केशव कळ्ळेकर, अजित वसंतराव पाटील, कृष्णा मल्लाप्पा कुंभार यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते..

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us