Screenshot_20240421_125943

खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:

  • लोकसभा निवडणूकीमध्ये पराभवाची भीती वाटू लागल्याने राज्यातील भाजप नेत्याकडून राज्य सरकारच्या 5 गॅरंटी योजना बद्दल अपप्रचार केला जात आहे. काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना विजय करून भाजपला मतदार योग्य धडा शिकवतील अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे उत्तर कन्नडा लोकसभा क्षेत्रातील भाजपचे उमेदवार विश्वेश्वर हेगडे यांनी सरकारच्या योजना बद्दल अपप्रचार करून मत मिळवण्याचा प्रकार करत आहेत. पण राज्यातील जनता अत्यंत शहाणी आहे. काँग्रेस पक्षाच्या योजना लाभदायक असल्याने जनतेने आता काँग्रेस पक्षाची निवड केली आहे. भाजपवाल्यांचे राजकारण म्हणजे लोक मेले तरी चालतील तथापि आपण राजकारण सोडणार नाही. अशा परिस्थितीत असल्यामळे जनताच त्यांना योग्य धडा देईल असे डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी म्हटले आहे.
  • दोनच दिवसांपूर्वी कारवार लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी डॉक्टर अंजली निंबाळकर ह्या राजकारणात लहान आहेत त्यांना राजकारण कळत नाही. असे एका सभेत उद्देशून म्हटले आहे. या संदर्भात बोलताना त्या म्हणाल्या, आपण त्यांच्या वक्तव्यावर उत्तर देत नाही. आपण राजकारणात लहान आहे, मोठी व्हायला आपण येथे आलो नाही. आपण समाजसेवेसाठी ,गरिबांचा उद्धार डोळ्यासमोर ठेवून येथे आलो आहे. असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
  • त्यापुढे म्हणाल्या, काँग्रेस सरकार केंद्रात असताना शेतकऱ्यांची कर्ज माफ केली होती. आज शेतकरी कर्जाच्या खाईत अडकला आहे त्यांना योग्य न्याय देण्यासाठी भाजपने आत्तापर्यंत कोणत्या योजना अंमलात आणल्या आहेत याचे उत्तर त्यांच्याकडे नाही.

भाजपचा खोटेपणा चव्हाट्यावर! भीमाना नाईक

  • 2018 मध्ये होणावर येथील परेश मेस्ता या तरुणाच्या संशयित मृत्यूमागे काँग्रेसवाल्यांचा हात असल्याचा आरोप करत भाजपने त्यावेळी पोळी भाजली शिरसीत मध्ये जाळपोळ करण्यात आली आणि पुढे आपला बचाव करण्यासाठी भाजपचे उमेदवार विश्वेश्वर हेगडे यांनी पोलीस मधून घटनास्थळावरून पलायन केले असा आरोप शिरशीचे आमदार भिमांना नाईक यांनी केला पुढे चौकशीतून मेस्ता मृत्यू प्रकरणाबाबत सत्य उजेडात आले. भाजपचा खोटारडेपणा जगासमोर आला. असे यावेळी ते म्हणाले

खोटे बोलण्यात भाजपा आघाडीवर; पालकमंत्री मंकाळु वैद्य

  • भाजपने नेहमी खोटे बोलण्यात समाधान मानले आहे खोटे बोलून मते मागून लोकांची दिशाभूल करण्यात मात्र भाजप माहीर आहे मागील निवडणुकीत 100 दिवसात आपण आश्वासनाची पूर्तता करतो म्हणणाऱ्या भाजपने 100 10 वर्षे उलटली तरी अद्याप कोणतीच आश्वासनाची पूर्तता केली नाही भाजपला खोटे बोलणे तेवढेच जमते त्यामुळे अशा पक्षावर जनतेने विश्वास ठेवू नये असे विचार कारभार चे जिल्हा पालकमंत्री मंकाळ वैद्य यांनी केले यावेळी हल्ल्याच्या आमदार आरवी देशपांडे यांना पुढचे माजी आमदार व्ही एस पाटील युवा नेते विवेक आदींनी काँग्रेसच्या प्रचारात आघाडी घेतली असून कोणत्याही परिस्थितीत उत्तर कन्नड लोकसभा क्षेत्र काँग्रेसचाच बालेकिल्ला राहील असे भात भाष्य केले आहे आवाहन केले
Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us