Oplus_16908288

Oplus_16908288

खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी : खानापूर तालुक्यातील जांबोटी महसूल विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या गर्लगुंजी भागात नेम्मदि केंद्र सुरू करण्यात यावे अशी मागणी गर्लगुंजी भागातील शेकडो कार्यकर्त्यांचे नेतृत्व घेऊन ग्रामपंचायत सदस्य प्रसाद पाटील यांच्यासह एका शिष्टमंडळाने कर्नाटक राज्याचे महसूल मंत्री कृष्ण भैरेगौडा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली. आज सोमवारी खानापूर तालुका दौऱ्यावर आलेल्या मंत्री कृष्ण भैरेगौडा यांच्याकडे सादर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,गर्लगूंजी,इदलहोंड,शिंगिनकोप,खेमेवाडी,गणेबैल, निटूर, प्रभुनगर, माळअंकले, झाड अंकले , बाचोळी, शिवाजीनगर आणि इतर गाव जांबोटी येथील नेम्मदी केंद्र येथे जोडण्यात आली आहेत.पण गर्लगूंजी आणि जांबोटी चे अंतर अंदाजे 25 ते 27 की मी. आहे ,शेतकरी विद्यार्थी आणि नागरिकांना प्रत्येक लहान सहान सर्टिफिकेट ,वारसा ,इन्कम, डोमीसैल, इतर सर्वच महसूल ,शैक्षणिक,आणि शेती विषयी कामासाठी जांबोटी येथे जाव लागत पण अंतर 25 की.मी.असल्यामुळे आणि रस्ते खराब ,बस व्यवस्था,जंगली प्राण्यांची भीती या सर्व गोष्टींमुळे वरील पंचायती आणि गावातील नागरिकांना याचा भरपूर त्रास होत आहे त्यासाठी आज गर्लगूंजी ग्राम पंचायत सदस्य यांनी महसूल मंत्री कृष्ण भैरेगोडा याना कुसमळी येथे निवेदन देण्यान आले.

सदर निवेदन देताना कलाप्पा लोहार,मारुती पांडूचे,सतीश बुरुड ,भर्तेश तोरोजी,गुड्डू टेकडी,विवेक तडकोड,सुरेश जाधव,देमांना बसरिकट्टी वगेरे उपस्थित होते..महसूल मंत्री यांनी जिल्हाधिकारी यांना याविषयी क्रम घ्या असे सांगितले आणि सकारात्मक प्रतिसाद दिला. नेमदी केंद्र गर्लगूंजी येथे झाल्यास पूर्ण गर्लगूंजी, इदलहोंड, निटूर, हलकरणी, रामगुरवाडी पंचायत आणि या पंचायत मद्ये येणाऱ्या काही गावांना याचा फायदा होणार आहे असे ग्राम पंचायत सदस्य प्रसाद पाटील यांनी सांगितले..

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us