IMG-20230813-WA0009

खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी :
मराठा मंडळ ही कर्नाटकातील सर्व क्षेत्रात अग्रगण्य असणारी शिक्षण संस्था आहे. याच शिक्षण संस्थेचे शिल्पकार शिक्षण महर्षी माजी अध्यक्ष कै.श्री नाथाजीराव गुरूअण्णा हलगेकर यांच्या त्या धर्मपत्नी होत्या. कोल्हापूर माहेरवाशीण असणाऱ्या पद्मजादेवी यांचा जन्म येथील नामांकित पवार घराण्यात झाला होता. पती कै. श्री नाथाजीराव हलगेकर यांच्या शैक्षणिक कार्यात स्वतःची स्वप्नं विलीन करून बेळगाव परिसरात शिक्षणाचा वेगळा आयाम निर्माण करण्यात त्यांचा नेहमीच उल्लेखनीय सहभाग राहीला आहे. सगळीकडे नेहमी फुलमाळेतील फुलांचं कौतुक होते पण त्या फुलांना गच्च पकडून ठेवणाऱ्या धाग्याचा कौतुक कधीच होत नाही. प्रसिद्धी परान्मुख असणाऱ्या आदरणीय पद्मजादेवी हलगेकर यांचं जगणं ही असच होतं म्हणून त्या कधीच प्रकाश झोतात आल्या नाहीत. किंबहुना त्यांनी निरंतर तेवत राहणाऱ्या समई प्रमाणे शैक्षणिक प्रकाश देण्याचं कार्य आजीवन चालू ठेवले होते याची साक्ष म्हणजे मराठा मंडळाचा विशाल असा यशस्वी शैक्षणिक पसारा आहे. आदरणीय श्रीमती कै. पद्मजादेवी हलगेकर या मराठा मंडळाच्या विद्यमान अध्यक्षा डॉक्टर राजश्री नागराजू तसेच पुणे स्थित डॉ. सत्त्वशीला शिरोळे व मराठा मंडळाचे उपाध्यक्ष श्री राजेश हलगेकर यांच्या मातोश्री असून, स्नूषा विश्वस्त सौ. धनश्री राजेश हलगेकर व बेंगळुरू येथील विद्यमान एम एल सी श्री नागराजू यादव आणि पुणे येथील प्रसिद्ध उद्योगपती मान श्री चैतन्य शिरोळे यांच्या सासुबाई होत्या. त्यांच्या जाणेने असंख्य नातवंडाचे गोकुळ हरवले आहे. अंत्ययात्रा कामत गल्ली येथून रविवार दिनांक 13 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10:00 वाजता निघणार असून अंत्यविधी कामत गल्ली स्मशान भूमित होणार आहे. मृत्यू समयी त्यांच वय 85 होते.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us