- खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी: खानापूर तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती पाहणी दौरा करण्यासाठी आलेल्या जिल्हाधिकारी नितेश पाटील तसेच जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी हरीश भोवर यांनी कौंदल भागातील पिकांची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला दरम्यान कौंदल ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन सादर करण्यात आले. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की आपल्या भागात दरवर्षी पेक्षा या वर्षी पावसाची सरासरी फारच कमी आहे त्यामुळे माळवड जमिनीतील भात पिके सध्या परिस्थितीत पूर्णतः सुकून गेली आहेत शिवाय पाणथळ जमिनीतील भात पिके पाण्याअभावी खुंटल्याने यावर्षी उत्पादनात मोठी घट होणार आहे यासाठी खानापूर तालुका हा दुष्काळ म्हणून जाहीर करावा असे या निवेदनात म्हटले आहे सदर निवेदन स्वीकारून जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी आपण या भागासह तालुक्यातील विविध ठिकाणची भौगोलिक परिस्थिती व पिकांची पाहणी करून राज्य सरकारकडे तसा अहवाल सुपूर्त करत आहोत. तसेच खानापूर तालुका ही दुष्काळी यादीत समावेश करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची आपण चर्चा करून तसा प्रस्ताव पास करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जिल्हाधिकारी श्री नितेश पाटील, व जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर दिला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य उदय भोसले, खानापूर रयत संघटणेचे अध्यक्ष श्री. किशोर मिटारी ही उपस्थित होते, त्याच बरोबर कौंदल गावातील ग्रामस्थ, श्री टोपान्ना पाटील, पुंडलिक कोलेकर, नारायण हू कोलेकर,रामचंद्र द. पाटील, दिनेश बाबुराव पाटील, जोतिबा रा.पाटील, संतोष दे. भोसले, गणपती ता पाटील, किरण अ पाटील,लक्ष्मी द पाटील, सिंधुका गु. पाटील व ई. गावकरी उपस्थित होते