IMG-20231209-WA0020
  • खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी: दुपारच्या दरम्यान शेती पिकातून जाणारी 11000 के.व्हीं विद्युतधारित तार अचानकपणे तुटून ऊस पिकात पडल्याने उसाच्या फडाला आग लागून जवळपास 30 ते 40 टनाचे नुकसान झाल्याची घटना चापगाव येथे शनिवारी दुपारी घडली आहे. दरम्यान आजूबाजूला शेतवडीत काम करत असताना व विद्युत पुरवठा येताच एका ट्रान्सफॉर्मर जवळील खांबावर एका पक्षाला झटका बसताच विद्युतभारीत तार तुटून पडली. व एकच आवाज येत अचानकपणे आग पेटू लागल्याचे जवळ असलेल्या काही शेतकऱ्यांच्या लक्षात आले. हेस्कॉम कर्मचाऱ्यांना तातडीने फोन करून या भागातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला. पण आगीच्या ठिणगीने उसाच्या फडाला आग लागल्याने बघता बघता 30 ते 40 टन ऊस जळून खाक झाला.

  • दरम्यान जवळपास असलेल्या अनेक शेतकऱ्यांनी या ठिकाणी वीज पुरवठा खंडित करतात लागलेली आग विझवण्यात यश आले. अन्यथा या भागातील जवळपास 300 ते 400 टन ऊस जळून खाक झाला असता. सदैवाने पिकाची मोठी हानी ठरली आहे. मात्र या विद्युत तारेच्या स्पर्शाने येथील विनाजी शंकर पाटील त्यांचे जवळपास 30 ते 40 जणांचे नुकसान झाले आहे. यावेळी उपस्थित शेतकरी उदय पाटील, गजानन पाटील ,कृष्णा पाटील, किरण पाटील, विष्णू पाटील, हनुमंत बेळगावकर, अनिल बेळगावकर, जयराम पाटील, बाळू जुवाई, गजानन बेळगावकर, नारायण बेळगावकर आदी शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठी हाणी टळली आहे.
Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us