बेळगाव : अनगोळ तलावाशेजारील शेतवाडीमध्ये एकाचा डोकीत घाव घालून निर्गुण खून करण्यात आल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली आहे.
खून झालेल्या व्यक्तीचे नाव संजय तुकाराम पाटील (वय 34, रा. जिजामाता गल्ली, येळळूर) असे मृताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संजय हा बुधवारी दुपारी कामानिमित्त घराबाहेर पडला होता; तो रात्रीपर्यंत घरी परतलाच नाही. त्यानंतर आज गुरुवारी सकाळी त्याचा मृतदेह खून झालेल्य अवस्थेत अनगोळ तलावा शेजारील शेतात आढळून आला.
अज्ञात मारेकऱ्यांनी डोक्यात जबर घाव घातला असावा अशी शक्यता व्यक्त होत आहे. डोक्यात वर्मी मार लागल्याने अतिरक्तस्त्रावामुळे घटनास्थळीच मृत्यू झाल्याचा कयास आहे. आज गुरुवारी सकाळी शेतात कामासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या निदर्शनास खुनाचा हा प्रकार येताच त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. टिळकवाडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करण्याबरोबरच मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलकडे पाठवला आहे. पु टिळकवाडी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली असून पोलिस त्याचा तपास करत आहे.