बेळगाव : बेळगाव शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या सुपुत्राने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली आहे.
सदर युवकाचे नाव प्रतीक प्रकाश शिरोडकर वय 29 असे त्या युवकाचे नाव आहे. मिळालेली माहिती की रात्री नऊच्या सुमारास घरातील सर्व मंडळी एका खोलीत बसली होती. पण याच वेळी प्रतिकने दुसऱ्या खोलीत जाऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले असून त्याच्या आत्महत्याचे नेमके कारण मात्र कळू शकले नाही. प्रतिकचा महिनाभरापूर्वीच विवाह झाला होता. याबाबत पोलिस अधिक तपास करत आहे.
त्याच्या पश्चात पत्नी, आई-वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. प्रतीकचे आकस्मित जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे.