- खानापूर लाईव्ह न्युज :
- खानापूर तालुक्यात घोरपडीचे प्रकार वरचेवर भरत आहेत तरीही तालुक्यातील आजही अज्ञाभिन आहेत. घरचा समोरील कुलूप बंद दरवाजा पाहून पाठीमागच्या दरवाजाने घरपोडीचे प्रकार घडत असतानाही घरात दागिने पैसे ठेवून कुलूप बंद घरे करून बाहेर जाणे धोक्याचे ठरत आहे. अशाच प्रकारे बुधवारी खानापूर तालुक्यातील सागरे गावात ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर चोरटे पुन्हा सक्रिय झाल्याने नागरिकांची झोप उडाली आहे. नंदगड (ता. खानापूर) पोलिस स्थानकाच्या हद्दीत चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. सागरे येथे बंद घरांचे कुलूप तोडून 5 तोळे सोन्याचे दागिने, 15 तोळे चांदी आणि 7000 रुपये लांबविल्याची घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली.
- गावच्या मध्यवस्तीत असणाऱ्या परशराम पाटील यांच्या घरातील सर्वजण कामानिमित्त बाहेर गेलेल असताना मागचा दरवाजा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. तिजोरीतील अडीच तोळ्याचे सोन्याचे गंठण, दोन अंगठ्या, पंधरा तोळे चांदी आणि सात हजार रुपये लंपास केले. नंदगड पोलिसांनी सदर घटनेचा पंचनामा केला आहे. घटनास्थळी स्वान पथकाला पाचारण करून पाहणी केली. सुगावा लागला नाही.